शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेचे रत्नागिरीत उपाेषण

By मेहरून नाकाडे | Updated: February 13, 2024 16:00 IST

रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेतर्फे मंगळवारी ( दि. १३) विभागिय कार्यशाळेसमोर पदाधिकारी ...

रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेतर्फे मंगळवारी ( दि. १३) विभागिय कार्यशाळेसमोर पदाधिकारी बेमुदत उपाेषणाला बसले आहेत.एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घरभाडे भत्त्याची व वार्षिक वेतनवाढीची वाढीव दराची थकबाकी देण्याबाबत १५ दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यांच्या उपस्थितीत मान्यताप्राप्त कामगार संघटनेसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे मान्य केले होते; परंतु ४ महिन्यांचा कालावधी संपूनही अद्याप बैठक झालेली नाही; तसेच सन २०१६ ते २०२० च्या कामगार करारासाठी शासन/प्रशासनाने एकतर्फी जाहीर केलेल्या ४ हजार ८४९ कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप, पाच हजार, चार हजार, २,५०० मूळ वेतनात दिलेल्या वाढीमुळे सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील विसंगती दूर करून सरकसकट पाच हजार रुपये देण्यात यावे, या मागण्यांवर संघटना ठाम आहे.सर्व प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या सोडवणुकीसाठी संघटनेतर्फे उपोषणाचा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी दिला होता. त्यानुसार रत्नागिरी विभागिय कार्यशाळेसमोर कामगार संघटनेचे रत्नागिरी विभागिय अध्यक्ष राजेश मयेकर, सचिव रवि लवेकर, कार्याध्यक्ष शेखर सावंत, खजिनदार अमित लांजेकर तसेच अन्य आगाराचे पदाधिकारी उपोषणास बसले आहेत. शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास उपोषण कायम करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीagitationआंदोलन