शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उंबर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभाराविरोधात पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 16:36 IST

प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगले काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी उंबर्ले आठगाव पंचक्रोशीतील जनतेने उंबर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर उपोषण सुरु केले आहे.

ठळक मुद्दे कामचुकार कर्मचाऱ्यांची बदली करा भोंगळ कारभाराविरोधात पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक

दापोली : दापोली तालुक्यातील उंबर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामचुकार आरोग्य कर्मचाऱ्यांची बदली व्हावी, आरोग्य केंद्रात इमानेइतबारे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची हेतूपुरस्सर केलेली बदली रद्द व्हावी, रूग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या व कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तत्काळ बदली करावी, प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगले काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी उंबर्ले आठगाव पंचक्रोशीतील जनतेने उंबर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर उपोषण सुरु केले आहे.या उपोषणाकरिता आठ गाव पंचक्रोशीचे अध्यक्ष सुरेश माने, माजी सभापती वसंत पाते, उंबर्ले सरपंच सुनीता आग्रे, अशोक शिगवण, सुभाष शिगवण, किसन भाताडे, डी. एल. कोलंबे, रामचंद्र पांगत, लक्ष्मण पांगत, लक्ष्मण कासेकर, प्रकाश जोशी, मंगेश पवार, शैलेश पाते, मनोज माने यांच्यासह उंबर्ले, ओळगाव, किन्हळ, नानटे, माथेगुजर, गावरई, तेरेवायंगणी, निगडे या गावांतील शेकडो लोकांनी या उपोषणात सहभाग घेतला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाच्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सरोदे हे चांगले काम करत आहेत. परंतु काही कामचुकार कर्मचाऱ्यांनी त्यांची पंचायत समितीकडे तक्रार दाखल केली आहे. या डॉक्टरांविरोधात पंचायत समितीने चौकशी समिती नेमली.

चौकशी समितीच्या अहवालानुसार त्यांची बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येथीलच काही कामचुकार कर्मचाऱ्यांना ते नको आहेत, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेला चांगला अधिकारी गमवायचा का? कामचुकार कर्मचाऱ्यांची बदली करून त्यांना शिक्षा देण्याऐवजी त्यांना अभय दिले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ज्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम ६० टक्यावरुन १०० टक्क्यावर नेवून ठेवले, या अधिकाऱ्याविरोधात जनतेची कोणतीही तक्रार नाही. परंतु काही कामचुकार कर्मचाऱ्यांना ते अडचणीचे ठरत असल्यामुळे दबाव आणून त्यांची बदली करण्याचा घाट कोणी घालत असेल तर जनता गप्प बसणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. 

 

ग्रामस्थ व रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांबद्दल तक्रार नाही. परंतु डॉ. सरोदे यांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याने नवजात शिशूला मृत्यूला सामोरे जावे लागले, अशी खोटी तक्रार याच आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केली. मात्र, त्या बाळाच्या आईची कोणतीही तक्रार नाही.- वसंत पाते, माजी सभापती 

जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्यमंत्री, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याकडे गेले ६ महिने पत्रव्यवहार सुरु आहे. परंतु कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. जे चांगले काम करतात, त्यांची बदली करून स्थानिक जनतेवर अन्याय केला जात आहे.- सुरेश माने, अध्यक्ष, आठगाव विकास मंडळजनतेला चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी नियमित उत्तम सेवा बजावणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. डॉ. सरोदे येथील जनतेला उत्तम सेवा देत असून, कामचुकारपणा करून डॉ. सरोदेंना त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच येथून बदली करावी, तरच येथील वातावरण शांत होईल.- सुनीता आग्रे,उंबर्ले सरपंच

टॅग्स :Healthआरोग्यRatnagiriरत्नागिरी