शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत ४०० वर्षांपूर्वीचा महाकाय गोरख वृक्ष, उष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणाऱ्या या वृक्षाचे महत्व काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 11:56 IST

पर्यटनदृष्ट्या या 'हेरिटेज ट्री'चा वापर करून येथे उत्तम पर्यटनस्थळ निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे.

रत्नागिरी : सुमारे ४०० वर्षांहून अधिक जुना गोरखचिंचेचा महाकाय वृक्ष आजही दिमाखात उभा आहे असे सांगितले तर विश्वास बसणार नाही. पण खरच असा वृक्ष आजही रत्नागिरीत आहे. त्याचे महत्व ओळखून तत्काळ त्याचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी घेतला आहे. पर्यटनदृष्ट्या या 'हेरिटेज ट्री'चा वापर करून येथे उत्तम पर्यटनस्थळ निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे.आफ्रिका खंडात, मादागास्कर, ऑस्ट्रेलिया येथे व उष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणाऱ्या या वृक्षाला 'आफ्रिकन बाओबाब' असे म्हटले जाते. रत्नागिरीतील उद्यमनगर येथील महिला रुग्णालयाच्या परिसरामध्ये हा वृक्ष आढळला आहे. जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.वृक्ष दुर्लक्षित असून त्याच्या बुंध्याभोवती कचरा साठला असून वेलींनी झाडाला गुरफटून टाकले आहे. महिला रुग्णालयाच्या बांधकामामध्ये हे झाड शाबूत राहिले आहे. उद्यमनगर येथील स्थानिकांनी याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी तत्काळ या झाडाचे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे.गोरखचिंच वृक्षाचे महत्त्वआफ्रिकन बाओबाब वृक्षांची उंची ५० फुटांपर्यंत असते. हा पानगळी वृक्षामध्ये मोडतो. खोडाचा परीघ १०० फुटांपर्यंतही असतो. खोडाचा जाड पापुद्रा राखाडी रंगाचा असतो. फुले मांसल ५ पाकळ्यांची असून, लांब देठाने झाडावर लटकत राहतात. ती रात्री फुलतात. त्यांना मंद सुवास असतो. फुले गळून तेथे बाटलीच्या आकाराची फूटभर लांबीची फळे येतात. ती राखाडी रंगाच्या व कठीण कवचाच्या दुधी भोपळ्यांसारखी दिसतात.खोडामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठते, त्यामुळे पाणी कमी असलेल्या प्रदेशातसुद्धा हे वृक्ष तग धरतात. त्यांचे आयुष्य १००० वर्षे असते.  अशा खोडात मादागास्करमध्ये आलेल्या वादळाच्या वेळी काही लोकांनी आश्रय घेतला होता.

महिला रुग्णालयामध्ये आफ्रिकन बाओबाब हे आकर्षक वृक्ष आढळले आहे. त्याचे जतन करून खासगी कंपनीच्या सीआरएस फंडातून हेरिटेज ट्री म्हणून पर्यटन सेल्फी पॉइंट विकसित करण्यात येणार आहे. पंधरा दिवसात त्याचे काम सुरू होईल. - डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीenvironmentपर्यावरण