शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

ऋषिकेश सनगरेने आधी ठरवून केला भिकाजी कांबळेंचा खून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 16:07 IST

रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे गावातील घारपुरेवाडीत लग्नाला विरोध केल्याच्या रागातून मुलीच्या वडिलांचा गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी संशयित आरोपी ऋषिकेश सनगरे याला प्रथम अटक झाली होती. त्याने सहा महिने आधीच रिव्हॉल्वरची खरेदी केली होती. त्यामुळे कांबळे यांना मारण्याचा त्याचा कट नियोजित होता, असे प्राथमिक तपासानंतर स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देऋषिकेश सनगरेने आधी ठरवून केला भिकाजी कांबळेंचा खून?सहा महिने आधीच केली रिव्हॉल्वरची खरेदी

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे गावातील घारपुरेवाडीत लग्नाला विरोध केल्याच्या रागातून मुलीच्या वडिलांचा गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी संशयित आरोपी ऋषिकेश सनगरे याला प्रथम अटक झाली होती. त्याने सहा महिने आधीच रिव्हॉल्वरची खरेदी केली होती. त्यामुळे कांबळे यांना मारण्याचा त्याचा कट नियोजित होता, असे प्राथमिक तपासानंतर स्पष्ट होत आहे.त्यानंतर आणखी दोघांना याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी मुंबईतून अटक केली. संदीपकुमार यादव (२६, उत्तरप्रदेश) व चंदनकुमार कुशवहा (२६, रा. मुजफ्फरनगर, बिहार) अशी या संशयितांची नावे असून, त्यांना पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले. गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता त्यांना २८ एप्रिलपर्यंत पोलीसकोठडी सुनावण्यात आली आहे.ऋषिकेश याचे मृत कांबळे यांच्या मुलीवर प्रेम होते. मात्र, त्याला मृत भिकाजी कांबळे यांचा विरोध होता, तर मुलीचाही त्याच्याशी लग्नास नकार होता. त्यातच कांबळे कुटुंबाला ऋषिकेश सनगरे याने १० हजार रुपये दिले होते. ते दिले नाहीत, याचा राग होता. त्यामुळे गेल्या आठवड्यात कोतवडे येथे भिकाजी कांबळे यांचा रिव्हॉल्वरने गोळ्या झाडून त्याने खून केल्याचे तपासात पुढे आले. खून झाला त्याच दिवशी सनगरे याला अटक करण्यात आली होती.खुनासाठी वापरलेले शस्त्र त्याने कोठून आणले, याबाबत पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर बोरिवली येथील चंदन व संदीप यांनी आपल्याला बिहारमधून हे शस्त्र आणून दिल्याची माहिती सनगरे याने पोलिसांना दिली होती. त्यानंतर हे शस्त्र पोलिसांनी हस्तगत केले व मुंबईत राहणाऱ्या चंदन व संदीप या संशयित आरोपींना अटक केली. हे शस्त्र सनगरे याने नोव्हेंबर २०१८मध्ये ३५ हजार रुपयांना त्या दोघांकडून विकत घेतल्याचे तपासात पुढे आले.दोन आरोपींनी सनगरेला शस्त्र विक्री केलेली असल्याने यामागे रॅकेट काम करीत असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. त्यामुळे या रॅकेटचा शोध घेण्यासाठी या सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. आता या रॅकेटचा तपास पोलीस करणार आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी