‘जलयुक्त शिवार’मुळे केतकी स्वयंपूर्ण

By Admin | Updated: July 8, 2016 01:03 IST2016-07-07T23:32:21+5:302016-07-08T01:03:53+5:30

वळण अन् सिमेंट बंधारे : लागवड वाढली, गाव टँकरमुक्त

How self-sufficient is because of the watery shiver? | ‘जलयुक्त शिवार’मुळे केतकी स्वयंपूर्ण

‘जलयुक्त शिवार’मुळे केतकी स्वयंपूर्ण

चिपळूण : जलयुक्त शिवार अभियान या महत्त्वाकांक्षी योजनेत २०१५ - १६मध्ये निवड झालेल्या केतकी गावात करण्यात आलेल्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, गतिमान पाणलोट (जलयुक्त शिवार अभियान) लोकसहभाग व सी. एस. आर.अंतर्गत लोकसहभागातील कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली, तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या फळबाग व वृक्ष लागवड, मृद व जलसंधारणाच्या सलग समपातळीतील चर, अनगड दगडी बांध, वळण बंधारे, सिमेंट बंधारे, शेततळे आदींमुळे केतकी गाव टँकरमुक्त झाला आहे. त्याचबरोबर रब्बी हंगामातील कडधान्य पिकाखालील क्षेत्र वाढ व खरीप हंगामात भातपिकाच्या लावणीसाठी जलयुक्त शिवार अभियानातील वळण बंधारे उपयुक्त असल्याचे दिसून येत आहे.
कोकणात दरवर्षी सरासरी ४५०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडतो. परंतु दऱ्याखोऱ्यातील, डोंगरातील हे सर्व पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळत असल्याने जानेवारी महिन्यापासूनच पाण्याची टंचाई जाणवते. परंतु, केतकी गावी या अभियानाअंतर्गत २०१५-१६ मध्ये केल्या गेलेल्या मृद संधारणाच्या जलस्रोत बळकटीकरण, बोअरवेल्स, फळबाग व वृक्ष लागवड व २०१६ - १७मध्ये चार वळण बंधारे, सिमेंट बंधारे बांधल्याने पावसाचे लाखो लीटर पाणी अडवले गेले. यामुळे परिसरातील जलस्रोत, विहिरीतील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे.
जलयुक्त शिवार अभियानातील सिमेंट बंधारे जलस्रोतांमधील निर्माण झालेल्या अतिरिक्त पाण्याचा वापर करुन खरीप हंगामात भातशेतीला पाणी वळवून घेण्याबरोबर या बंधाऱ्यातील पाणी पाऊस संपल्यानंतर रब्बी हंगामात कडधान्यवर्गीय पिके, भाजीपाला पिकासाठी वापरून रब्बी हंगामात पिकाखालील क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. केतकी येथे कृषी विभाग, महसूल विभाग, एक्सेल कपंनी व शासनाच्या विविध विभागाच्या समन्वयाने पाणी आडवा, पाणी जिरवा हा उपक्रम यशस्वीपणे राबवणार असल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे यांनी कृषी जागृती सप्ताहअंतर्गत कृषी विभागातर्फे आयोजित सिमेंट बंधाऱ्यातील जलपूजन कार्यक्रमावेळी केतकी येथे व्यक्त केले. (प्रतिनिधी)


दादा गरंडे : ग्रामस्थांचा सहभाग, पाणलोट समितीच्या सहकार्याने योजना पूर्णत्त्वास...
जलयुक्त शिवार अभियान राबवताना कृषी विभागासोबत स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग, श्रमदान, पाणलोट समिती, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांचे सहकार्य मिळाल्याने जलस्वराज्य योजना यशस्वीरित्या पूर्णत्त्वास जात आहे. केतकी गावात राबवत असलेल्या सर्वसमावेशक योजना इतरही गावात राबवून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कालुस्ते येथील कृषी सहाय्यक दादा गरंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

केतकी गावात पाणलोट व जलयुक्त शिवार अभियानातील वेगवेगळ्या कामामुळे यावर्षी पाण्याची टंचाई भासली नाही. तसेच या अभियानात कृषी विभाग सीएसआरअंतर्गत व गावातील लोकसहभागातून केलेली विविध कामे यामुळे निर्माण झालेल्या पाणीसाठ्याचा रब्बी पिकासाठी वापर होत आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात वाढ करून येथील शेतकरी उत्पन्न घेत आहेत, असे सरपंच समीक्षा गोंधळेकर यांनी सांगितले.

Web Title: How self-sufficient is because of the watery shiver?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.