शॉपिंग सेंटरचे गाळे गोडावूनसाठी कसे काय दिले

By Admin | Updated: May 22, 2014 00:53 IST2014-05-22T00:47:55+5:302014-05-22T00:53:50+5:30

सुरेखा खेराडे यांचा सवाल

How did you get shopping for a shopping center? | शॉपिंग सेंटरचे गाळे गोडावूनसाठी कसे काय दिले

शॉपिंग सेंटरचे गाळे गोडावूनसाठी कसे काय दिले

 चिपळूण : शहरातील नगर परिषदेच्या एल टाईप शॉपिंग सेंटरमधील चार गाळे कोणतेही करारपत्रक न करता गोडावूनसाठी कसे काय देण्यात आले असा सवाल शिवसेनेच्या नगरसेवक सुरेखा खेराडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोर असलेल्या नगर परिषदेच्या एल टाईप शॉपिंग सेंटरमधील अनेक गाळे हे बंद आहेत. मात्र, या गाळ्यांचा परस्पर गोडावूनसाठी वापर केला जात आहे. हे उघड झाले आहे. नगर परिषदेचे कर्मचारी राम देवळेकर व मनोज शिरगांवकर यांच्या उपस्थितीत या इमारतीमधील सर्व गाळे उघडून पाहणी केली त्यावेळी चार गाळ्यामध्ये इलेक्ट्रॉनिक दुकानाचे सामान भरुन ठेवण्यात आले असल्याचे उघड झाले आहे असे खेराडे यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक दुकानदाराने या चार गाळ्यांपैकी ३ गाळ्यांची अनामत रक्कम नगर परिषदेकडे जमा केली आहे. मात्र, त्याबाबतचा करारनामा नगर परिषदेकडे करण्यात आलेला नाही. करारपत्र नसताना व शॉपिंग सेंटरसाठी हे गाळे असताना ते गोडावूनसाठी कसे काय दिले गेले असा सवालही खेराडे यांनी केला आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधला असता माहिती देण्यास टाळाटाळही केली जात आहे. सांस्कृतिक केंद्रानजीक असणार्‍या २४ गाळेधारक यांची भाड्याची रक्कम थकीत असल्याचेही उघडकीस आले असून या गाळेधारकांना नोटीसही पाठविण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, गाळे प्रकरणाबाबत आपण जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करणार असल्याचे खेराडे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: How did you get shopping for a shopping center?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.