शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

गृहनिर्माण संस्थांच्या नावे जमिनी करणार

By admin | Updated: January 2, 2015 00:08 IST

राधाकृष्णन बी. : मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र मिळण्यासाठी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी जमीन त्यांच्या नावावर होण्यासाठी आवश्यक असलेले मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र मिळण्यासाठी तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र गृहनिर्माण संस्थांना अभिहस्तांतरण प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही दोन महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा निर्धार आहे.रत्नागिरी जिल्ह्याच्या शहरी भागात सुमारे एक हजार सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. ग्रामीण भागातही सहकारी गृहनिर्माण संस्थांची फार मोठी संख्या आहे, परंतु अभिहस्तांतरण पत्र नसल्याने अनेक सोसायट्यांची जमीन संस्थांच्या नावावर होऊ शकलेली नाही. गृहनिर्माण संस्थांची जमीन संस्थांच्याच नावावर असावी, असे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र देण्याची योजना शासनाने लागू केली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पात्र गृहनिर्माण संस्थांना मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र देण्याचा संकल्प जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी सोडला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा उपनिबंधक आर. आर. महाजन, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, चिपळूणचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील, सहकारी अधिकारी के. एम. देवरुखकर आदींसह अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी, जिल्ह्यातील सर्व पात्र सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अर्ज दोन आठवड्यात प्राप्त करुन त्यांना जिल्हा उपनिबंधकांच्या माध्यमातून नियमानुसार अभिहस्तांतरण प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जिल्हा उपनिबंधक, सह जिल्हा निबंधक, जिल्ह्यातील नगरपालिकांचे सर्व मुख्याधिकारी, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या यंत्रणांच्या माध्यमातून ही कार्यवाही कालबध्द कार्यक्रम आखून पूर्ण करण्यात यावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. अभिहस्तांतरण प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक इमारतीचा बांधकाम परवाना, पूर्णत्वाचा दाखला, भोगवटा प्रमाणपत्र आदी कागदपत्र संस्थांना उपलब्ध करुन देण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात यावी. त्यासाठी संस्थांना संपूर्ण सहकार्य केले जावे. मात्र, ज्याठिकाणी बांधकाम परवान्याचे आणि नियमांचे उल्लंघन करुन बांधकाम करण्यात आले आहे. जे बांधकाम नियमित करणे शक्य नसेल, अशा संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. (प्रतिनिधी)शहरी भागात १ हजार संस्थाँ्नॅँजिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अभिहस्तांरण प्रक्रियेत जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाची सूचना केली असून, प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही साठ दिवसात करण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. गुहनिर्माण संस्थांची जमीन त्या संस्थेची असावी, असा धोरणात्मक निर्णय घेतला जात आहे.