शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

घरपट्टी वसुलीचा आलेख १६ कोटींवर!

By admin | Published: June 12, 2016 11:14 PM

पंधरा वर्षे : उद्योग, इमारतींमुळे ग्रामपंचायतींना घसघशीत उत्पन्न

रत्नागिरी : ग्रामीण भागात वसूल करण्यात येणाऱ्या घरपट्टीमध्ये मागील १५ वर्षांमध्ये सुमारे १६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सन २००१-२००२ या आर्थिक वर्षामध्ये घरपट्टीची वसुली ९७ टक्के म्हणजेच ५ कोटी ५४ लाख ४६ हजार ३७६ रुपये होती. जिल्हा परिषदेला या घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. जिल्ह्यात ८४४ ग्रामपंचायती असून, ही घरपट्टी आकारणी या ग्रामपंचायतींकडून करण्यात येते. जिल्ह्यात उद्योग, व्यापार, कारखानदारी असलेल्या अत्यल्प ग्रामपंचायती आहेत. त्यामध्ये रत्नागिरीतील तालुक्यातील शिरगाव, फणसोप, जयगड, कुवारबाव, मिरजोळे या ग्रामपंचायतींचा समावेश असून, अन्य तालुक्यांमध्येही कारखानदारी असलेल्या मोजक्या ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींचे वार्षिक उत्पन्न हे लाखो रुपयांचे आहे. त्याचबरोबर बाजारपेठ असलेल्या संगमेश्वर, सावर्डा, पाचल अशा ग्रामपंचायतींचे उत्पन्नही जास्त आहे.दरम्यान, डोंगरदऱ्यात असलेल्या ग्रामपंचायतींना सोयी-सुविधांचा पुरवठा करताना शासनाकडून येणाऱ्या अनुदानावरच अवलंबून रहावे लागते. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये ग्रामपंचायतींनाही शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुदानामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये विकासकामे मोठ्या प्रमाणात मार्गी लागत आहेत. सन २००१-२००२ या आर्थिक वर्षामध्ये ९७ टक्के म्हणजेच ५ कोटी ५४ लाख ४६ हजार ३७६ रुपये एवढे जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींचे घरपट्टीच्या माध्यमातून उत्पन्न होते. त्यानंतर १० वर्षांच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या घरपट्टी उत्पन्नामध्ये दुप्पट वाढ झाल्याने सन २००९-१० मध्ये ११ कोटी २५ लाख ७८ हजार ५८५ रुपये एवढी ग्रामीण भागातील घरपट्टीची वसुली होती. त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी दीड ते दोन कोटी रुपयांनी या घरपट्टीमध्ये वाढ होत गेल्याने सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात ही घरपट्टी वसुलीची रक्कम ९२ टक्के म्हणजेच २१ कोटी ७० लाख ८० हजार ११६ रुपयांपर्यंत गेली. त्यामुळे १५ वर्षांच्या कालावधीत सुमारे १६ कोटी रुपयांची वाढ घरपट्टीच्या रक्कमेमध्ये झाली. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत वाढलेली कारखानदारी, व्यापार, उद्योग, वाढलेली बांधकामे यामुळे उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे. (शहर वार्ताहर)स्थगिती आदेशामुळे खोडा : केवळ २९ टक्के वसुलीउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने ६ एप्रिल २०१५ रोजी परिपत्रक काढून ग्रामपंचायत हद्दीतील इमारतींवर कर आकारणीस स्थगिती दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी कर वसुली बंद केली होती. त्यानंतर पुन्हा ३१ डिसेंबर २०१५ रोजी शासनाने भांडवली मुल्यांवर आधारित कर आकारणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ग्रामपंचायतींनी पुन्हा घरपट्टी वसुलीचे काम सुरु केले. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची सन २०१५-१६ची घरपट्टी वसुली २९ टक्के म्हणजेच ८ कोटी १७ लाख २४ हजार १७७ रुपये एवढी कमी झाली. चौरस फुटाच्या आधारे करग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील ३ डिसेंबर १९९९चे अधिसूचनेनुसार जमिनीच्या किंवा इमारतीच्या संपूर्ण क्षेत्रफळावर प्रति चौरस फुटाच्या आधारे कर आकारणी करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना देण्यात आले होते. त्यानुसार सन २००१-२००२ पासून ग्रामपंचायतींकडून चौरस फुटाप्रमाणे कर आकारणी सुरु झाली. त्यापूर्वी वार्षिक भाडे मुल्यावर आधारीत कर आकारणी करण्यात येत होती.