शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात दाभोळ, बाणकोट येथे लवकरच हाऊस बोट, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे पर्यटकांसाठी सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 15:54 IST

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे जिल्ह्यात तारकर्लीच्या धर्तीवर दाभोळ आणि बाणकोट खाडी येथे पर्यटकांसाठी लवकरच हाऊसबोट सेवा सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. योग्य कंत्राटदार मिळताच ही सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती येथील प्रादेशिक पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांनी लोकमतला दिली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे पर्यटकांसाठी सेवा तारकर्लीच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यात दाभोळ, बाणकोट येथे लवकरच हाऊस बोटपर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांची लोकमतला माहिती योग्य कंत्राटदार मिळताच होणार प्रारंभ : चव्हाण पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत

शोभना कांबळेरत्नागिरी : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे जिल्ह्यात तारकर्लीच्या धर्तीवर दाभोळ आणि बाणकोट खाडी येथे पर्यटकांसाठी लवकरच हाऊसबोट सेवा सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. योग्य कंत्राटदार मिळताच ही सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती येथील प्रादेशिक पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांनी लोकमतला दिली.पर्यटकांना कोकणच्या सागरी किनाऱ्यांचे आकर्षण आहे. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात कोकणात पर्यटकांची गर्दी वाढू लागते. पर्यटकांसाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने निवासाची अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

न्याहरी निवास योजनेमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहेत, त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी आता बोटसुविधा सुरू केल्या आहेत. गणपतीपुळे, गुहागर, दापोली आदी ठिकाणी बोटिंगची सुविधा असून, पर्यटक या सुविधेचा आनंद मोठ्या प्रमाणावर लुटत असल्याचे दिसत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी पर्यटन विकास महामंडळातर्फे विविध सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथे हाऊसबोट असल्याने या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढत आहे. रत्नागिरीतही अशी सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांची संख्या वाढेल, या उद्देशाने येथील पर्यटन विकास महामंडळाने जिल्ह्यात हाऊसबोट सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. बाणकोट आणि दाभोळ येथे ही सुविधा सुरू करण्याचा निर्णय पर्यटन विकास महामंडळाने घेतला आहे. निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. योग्य कंत्राटदार मिळताच सेवा सुरू करण्यात येईल, असे चव्हाण म्हणाले.पर्यटकांची संख्या वाढण्यास मदतसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथील हाऊसबोटीचे आकर्षण पर्यटकांना होते. त्यामुळे या सुविधेचा आनंद घेण्यासाठी येथील पर्यटक तारकर्ली येथे जात होते. मात्र, आता रत्नागिरीतील दोन ठिकाणी ही सेवा सुरू होणार असल्याने रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना लवकरच या सुविधेचा लाभ मिळणार आहे. यामुळे पर्यटकांची संख्याही वाढण्यास मदत होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात बाणकोट आणि दाभोळ या ठिकाणी  हाऊसबोट सेवा देण्याचा निर्णय प्रादेशिक पर्यटन विकास महामंडळाने घेतला असून, यासाठी दोन हाऊस बोटींची खरेदीही करण्यात आली आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, योग्य कंत्राटदार मिळाल्यानंतर लगेचच या बोटसेवेला प्रारंभ होणार आहे.- जगदीश चव्हाण,प्रादेशिक अधिकारी, पर्यटन विकास महामंडळ, रत्नागिरी

टॅग्स :Mirkarwada Bandarमिरकरवाडा बंदरRatnagiriरत्नागिरीtourismपर्यटन