शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri News: कशेडी घाट अपघातांचा ‘हॉटस्पॉट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 15:28 IST

वाहनचालकांचे प्रबोधन करणे आवश्यक

खेड : आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला ६ जानेवारी रोजी रात्री झालेल्या अपघातानंतर कशेडी घाटातील सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेला कशेडी घाट ‘हॉटस्पॉट’ ठरत आहे. याठिकाणी वेळीच उपाययोजना न केल्यास अपघातांचे प्रमाण असेच वाढत राहून अनेकांचा बळी जाण्याचा धोका आहे.मुंबई - गोवा महामार्गावर सुमारे तेरा किलोमीटर अंतराचा हा तीव्र उतार व नागमोडी वळणे असलेला घाट आहे. पूर्व-पश्चिम सह्याद्री पर्वताच्या उपरांगामध्ये हा घाट तयार करण्यात आला आहे. चौपदरीकरणात या घाटाला पर्यायी बोगदा तयार करण्याचे काम गेली चार वर्षे सुरू आहे. अद्यापही हे काम पूर्ण न झाल्याने धाेकादायक मार्गावरूनच वाहने हाकावी लागत आहेत. कशेडी घाटात पोलिस व महामार्ग विभाग प्रशासनाने वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणांना ‘डेंजर हॉटस्पॉट’ ठरवले आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झालेल्या ठिकाणी ७ नोव्हेंबर २०२२ रोजी रिक्षा व डंपर यांचा भीषण अपघात झाला होता. माणगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरातील या विद्यार्थिनी रिक्षाने खेड भरणे येथे डीएडच्या परीक्षेसाठी गेल्या होत्या. परीक्षा आटोपून परतत असताना हा अपघात झाला. कशेडी घाटातील चोळई गावच्या वळणावर वाळूने भरलेला डंपर रिक्षावर उलटला. त्यात चिरडून चौघांचा मृत्यू झाला होता.चौपदरणीकरणात नवीन तयार करण्यात येत असलेल्या बोगद्यामुळे महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन-तीन वर्षांत या घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे, तर दुसरीकडे घाटात तात्पुरते खड्डे भरण्याचे दिखाऊपणाचे काम करण्यात आल्याची ओरड होत आहे. सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. अवजड वाहतूक करणारे अनेक वाहनचालक इंधन वाचवण्यासाठी आपले वाहन न्युट्रल करून घाट उतरत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. मात्र, यामुळे हे वाहनचालक आपल्या व इतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जिवाशी खेळत असल्याचे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याबाबत वाहनचालकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे, याचबरोबर रखडलेल्या बोगद्याच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. बोगद्याचे काम लवकर पूर्ण झाल्यास हा मार्ग अधिक सुखकर होण्यास मदत होणार आहे.

  • २५ जानेवारी २०१९ रोजी रत्नागिरीचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते.
  • घाटाला पर्याय असलेल्या बोगद्याच्या कामाची तीस महिन्यांची मुदत डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास तत्कालीन बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला होता.
  • वारंवार होणाऱ्या अपघातांच्या घटनांनंतरही कशेडी घाटात पुरेशी उपाययाेजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढतच आहे.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात