शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हवामानामुळे 'कोकणचा राजा' हवालदिल, उष्णतेच्या लाटेने आंब्याला धोका

By मेहरून नाकाडे | Updated: February 16, 2023 13:10 IST

बागायतदारांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार

मेहरुन नाकाडेरत्नागिरी : गेल्या काही वर्षांत बदलत्या हवामानाचा कोकणातील फलोत्पादनाला चांगलाच फटका बसत आहे. यावर्षीही अचानक थंडी गायब होऊन उष्मा प्रचंड वाढला आहे. जिल्ह्याचे मुख्य उत्पादन असलेला आंबा ३४ अंश सेल्सियसपर्यंत तापमान सोसू शकतो. मात्र, सध्या ३५ अंशापेक्षा अधिक तापमान आहे. त्यामुळे आधीच उत्पादन अत्यल्प असलेला आंबा भाजण्याचा धोका निर्माण झाला आहे.गतवर्षी पावसाळा लांबल्याने उशिरापर्यंत पालवी येत होती. केवळ दहा टक्के झाडांनाच नियोजित वेळेत मोहर आला. नोव्हेंबरमध्ये अपेक्षित असलेली थंडी जानेवारीपासून सुरू झाली. तेव्हा मोहर प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या टप्प्यात आलेल्या मोहराचा आंबा तयार होऊन दि. १५ मार्चपासून बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र हा आंबा दि. १५ एप्रिलपर्यंतच पुरेल. त्यानंतर बाजारात विक्रीसाठी आंबा उपलब्ध नसेल, असा अंदाज आहे.दुसऱ्या टप्प्यात मोहर नसल्याने यावर्षी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. जानेवारीपासून मोहर येणे सुरू झाले. मात्र, त्याचे प्रमाण कमी आहे. रात्री थंडी व दिवसा कडकडीत ऊन अशी स्थिती आहे. थंडी पडत असली तरी दव पडत नाही. त्यामुळे मोहर प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. त्यातही जी फळप्रक्रिया सुरू झाली आहे, ती फळे अति उष्म्यामुळे पिवळसर पडून गळण्याची शक्यता आहे. याआधीच्या मोहराचे मोठे फळही भाजून त्यावर काळे डाग पडण्याचा धोका आहे व अशा आंब्याला बाजारात उठाव मिळत नाही.वाढत्या उष्म्याच्या धोक्यासोबतच हवामानातील बदलामुळे थ्रीप्स, तुडतुडा तसेच फळमाशी यासारख्या रोगांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे बागायतदारांना वेळोवेळी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे.

यावर्षी मुळातच आंबा कमी आहे, त्यातच नैसर्गिक बदलांमुळे पीक धोक्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत ३५ अंशापेक्षा अधिक तापमान आहे. आंबा पिकासाठी हे तापमान त्रासदायक ठरणारे आहे. त्यामुळे उष्म्याचे प्रमाण कमी न झाल्यास बागायतदारांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. - राजन कदम, बागायतदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाweatherहवामान