राष्ट्रवादी कॉँग्रेसला नवसंजीवनीची आशा

By admin | Published: June 30, 2017 03:36 PM2017-06-30T15:36:31+5:302017-06-30T15:36:31+5:30

रत्नागिरीत १ जुलै रोजी महामेळावा

Hope of Innovation for Nationalist Congress Party | राष्ट्रवादी कॉँग्रेसला नवसंजीवनीची आशा

राष्ट्रवादी कॉँग्रेसला नवसंजीवनीची आशा

Next

आॅनलाईन लोकमत

रत्नागिरी, दि. ३0 : विधानसभेच्या संभाव्य मध्यावधी निवडणुकांची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसनेही निवडणुकीची मोचेÊबांधणी आतापासूनच सुरू केली आहे. जिल्ह्यात शिवसेनेला तुल्यबळ असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचा महामेळावा येत्या १ जुलै २०१७ रोजी रत्नागिरीत होणार आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. रत्नागिरीतील या मेळाव्यात विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नेत्यांवर राजकीय शरसंधान साधले जाण्याची शक्यता आहे. मेळाव्यातून पक्षाला जिल्ह्यात नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही वषाÊंपासून शिवसेनेने आपले वचÊस्व निमाÊण केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही सेनेला तूल्यबळ घोडदौड जिल्ह्यात सुरू ठेवली आहे. जिल्ह्यातील पाचपैकी रत्नागिरी, राजापूर-लांजा व चिपळूण या ३ विधानसभा मतदारसंघात सेनेचे आमदार आहेत. गुहागर व दापोली-खेड या २ विधानसभा संघात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला तूल्यबळ पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे पाहिले जात आहे. राज्यात कॉँग्र्रेस आघाडीची सत्ता असताना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविलेले तसेच पक्षाचे प्रदेश अध्यक्षपद सांभाळलेले आमदार भास्कर जाधव हे मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जातात. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून उत्तर रत्नागिरीत पक्षाच्या मेळाव्यांचा धडाका लावला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षबदल करणाऱ्या व सध्या सेनेचे रत्नागिरीचे आमदार असलेल्या उदय सामंत यांच्यावर मेळाव्यातून जोरदार टीका सुरू केली आहे.

सामंत हे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये असताना रत्नागिरी तालुक्यात राष्ट्रवादी संघटना मजबूत होती. मात्र, सेनेत जाताना त्यांनी राष्ट्रवादीतील असंख्य नेत्या-कायÊकत्याÊंना बरोबर नेल्याने रत्नागिरी तालुक्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आले. पक्षाने मंत्रीपदापासून असंख्य पदे देऊनही त्यांनी पक्षाला दगा दिल्याची टीका जाधव करीत आहेत.

एकीकडे जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीचे जोरदार प्रयत्न सुरू असताना आता राष्ट्रवादी कॉँग्रेसलाही प्रतिस्पधीÊ म्हणून आपले स्थान दक्षिण रत्नागिरीत निमाÊण करण्याची आवश्यकता निमाÊण झाली आहे. त्यामुळेच १ जुलै रोजी पक्षाचा मेळावा रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची घणाघाती भाषणे होणार असल्याने पक्षात नवचैतन्य निमाÊण होईल, अशी आशा राष्ट्रवादी कॉँग्रेसला वाटते आहे.

Web Title: Hope of Innovation for Nationalist Congress Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.