खासदार शाैकत मुकादम यांच्या भेटीसाठी घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST2021-07-03T04:20:44+5:302021-07-03T04:20:44+5:30
चिपळूण : राष्ट्रवादीचे नेते व पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांच्या निवासस्थानी रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक ...

खासदार शाैकत मुकादम यांच्या भेटीसाठी घरी
चिपळूण : राष्ट्रवादीचे नेते व पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांच्या निवासस्थानी रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी सदिच्छा भेट दिली. अचानक घेतलेल्या या भेटीने येथील राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगली आहे.
तिवरे धरण फुटीग्रस्त कुटुंबीयांसाठी अलोरे येथे उभारलेल्या घरांचे लोकार्पण शुक्रवारी करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त खासदार राऊत हे चिपळूण दौऱ्यावर आले होते. खासदार राऊत यांनी लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर अचानक मुकादम यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर मुंबईच्या दिशेने त्यांचा ताफा निघाला. मात्र, त्यांच्या अचानक भेटीने सारेच अवाक् झाले.
काही दिवसांपूर्वी अपरांत हॉस्पिटलच्या कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगीही राऊत यांनी मुकादम यांचे कौतुक केले होते. मुकादम यांच्या ‘तुम्ही खा आंबे, मला द्या बाटे’ या उपक्रमाचाही त्यांनी उल्लेख केला होता. त्यानंतर आता राऊत यांनी थेट त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या गोटातही दिवसभर जोरदार चर्चा सुरू होती.
-------------------------
खासदार विनायक राऊत यांनी चिपळूणचे माजी सभापती शाैकत मुकादम यांच्या घरी भेट दिल्यानंतर शाैकत मुकादम यांनी त्यांचा सत्कार केला.