नॅशनल हायस्कूलमध्ये हिंदी दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:33 IST2021-09-18T04:33:50+5:302021-09-18T04:33:50+5:30
दापोली : नॅशनल हायस्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज दापोली येथे ऑनलाइन हिंदी दिवस साजरा करण्यात आला. हिंदी दिनाचे औचित्य साधून ...

नॅशनल हायस्कूलमध्ये हिंदी दिन साजरा
दापोली : नॅशनल हायस्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज दापोली येथे ऑनलाइन हिंदी दिवस साजरा करण्यात आला. हिंदी दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये भाषण स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व व्याकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य आयुब कासिम मुल्ला यांनी भूषवले. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात नववीचा विद्यार्थी मुनिब मोईनुद्दीन नदवी याच्या सुमधुर आवाजात कुराणपठणाने झाली. सर्वप्रथम पाचवी ते दहावीच्या सहभागी विद्यार्थ्यांनी हिंदी दिवसाचे महत्त्व व्यक्त केले. प्रशालेचे सहायक शिक्षक रियाज रशीद म्हैशाळे यांनी हिंदी भाषेचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्यानंतर प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका अल्फिया पठाण यांनी हिंदी भाषेबद्दल विद्यार्थ्यांसमोर मांडले.
प्राचार्य आयुब मुल्ला यांनी इंग्रजी भाषेबरोबरच आपण उत्तम रीतीने हिंदी भाषा अवगत केली पाहिजे, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. एका भाषेचा दुसऱ्या भाषेशी कसा संबंध आहे हे स्पष्ट केले. जरी शाळा बंद असली तरी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षकांनी अशा कार्यक्रमाचे नियोजन वारंवार करावे, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे हिंदी शिक्षक मुजावर सादिक यांनी तर आभार प्रदर्शन प्रशालेचे उर्दू विषयाचे शिक्षक सलमान मोमीन यांनी केले.