महामार्ग चौपदरीकरण ही दिशाभूल
By Admin | Updated: October 1, 2014 01:06 IST2014-10-01T00:51:02+5:302014-10-01T01:06:54+5:30
चिपळूण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे.

महामार्ग चौपदरीकरण ही दिशाभूल
चिपळूण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. मात्र, या कामाबाबतच्या प्रस्तावाला अद्याप केंद्र शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही, असे असताना घाईगडबडीत पुलाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले, ही केवळ कोकणवासीय जनतेची दिशाभूल आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज (मंगळवारी) येथे केला.
शहरातील राधाताई लाड सभागृहात चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उमेदवार शेखर निकम, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम, कामगारमंत्री भास्कर जाधव, नगराध्यक्ष सावित्री होमकळस, प्रदेश निरीक्षक बाबाजी जाधव, गुहागरचे माजी सभापती नंदू पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मनीषा जाधव, दादा साळवी, माजी सभापती शौकत मुकादम, माजी नगराध्यक्ष हेमलता बुरटे, रिहाना बिजले, महिलाध्यक्ष चित्रा चव्हाण, नगरसेवक सुचय रेडीज, सभापती समीक्षा बागवे, माजी सभापती दीप्ती माटे, रमेश दळवी, अॅड. शांताराम बुरटे आदी उपस्थित होते.
राजकारण म्हटलं की, वैचारिक बदल होतातच. कोकणात विविध योजना याव्यात, ही आपली भूमिका आहे. अलिकडेच रत्नागिरीनजीक राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन नितीन गडकरी, खासदार विनायक राऊत, अनंत गीते यांच्या उपस्थितीत झाले. या कामाला केंद्र शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही. कामाबाबतची प्रसिद्ध झालेली निविदा संबंधितांनी दाखवावी, असा इशारा तटकरे यांनी दिला. (वार्ताहर)