समुद्र किनाऱ्यावर हाय अलर्ट

By Admin | Updated: August 4, 2015 23:44 IST2015-08-04T23:44:42+5:302015-08-04T23:44:42+5:30

दापोली तालुका : किनाऱ्यावर आढळलेल्या बॅरलने खळबळ

High alert on the sea shore | समुद्र किनाऱ्यावर हाय अलर्ट

समुद्र किनाऱ्यावर हाय अलर्ट

दापोली : दापोली तालुक्यातील बुरोंडी ते आंजर्ले दरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर केमिकलने भरलेले १३ संशयास्पद बॅरल आढळून आल्याने किनारपट्टीवरील गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सन १९९०च्या आठवणी ताज्या झाल्याने दुसऱ्या दिवशीही समुद्रात अशा प्रकारचे काही बॅरल असल्याचे मच्छीमारांनी कळवले आहे. किनाऱ्यावरुन ताब्यात घेण्यात आलेल्या बॅरलमधील द्रव्य तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले असून, अहवालानंतर या घटनेचे गूढ उकलणार आहे.
दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्याचा यापूर्वी स्मगलिंगसाठी वापर झाल्याचा पुरावा आहे. याच किनारपट्टीवर संशयास्पद जहाजसुद्धा येऊन गेले होते. अशा प्रकारच्या घटना या समुद्रकिनाऱ्यावर वारंवार घडू लागल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुरोंडी, लाडघर, कोळथरे, कर्दे, मुरुड, पाळंदे, हर्णै, आंजर्ले, केळशी, आडे, पाडले या समुद्रकिनाऱ्यावर वारंवार संशयास्पद वस्तू किनाऱ्याला लागत आहे. सोमवारी दापोली पोलिसांना १३ बॅरल सापडल्यानंतर आजसुद्धा समुद्रात काही बॅरल तरंगत असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. मंगळवारी दिवसभर दापोली पोलीस बॅरलचा शोध घेत आहेत.
दापोलीत सापडलेल्या बॅरलमुळे खळबळ उडाली असून, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन दापोलीचे पोलीस निरीक्षक डॉ. नियल बेन यांनी केले आहे. समुद्र किनाऱ्यावरील शोधमोहिमेसाठी पोलीस उपनिरीक्षक शुभांगी म्हस्के, हर्णै, पोलीस उपनिरीक्षक सी. जी. कांबळे, बुरोंडी बीट अंमलदार बांगर, पोलीस उपनिरीक्षक पी. डी. कांबळे यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)

पोलीस यंत्रणा सतर्क...
जिल्ह्यात केवळ दापोली तालुक्यातील समुद्र किनारीच अशा बॅरल आढळून आल्या आहेत. या बॅरलमध्ये रसायन भरलेले होते. मात्र, ते कोणते, याचा शोध लागलेला नाही. अजूनही बॅरल किनारी येत असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. या बॅरेलमध्ये नेमके कोणते रसायन आहे, याचा शोध प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानंतरच लागणार आहे. पोलिसांनी सतर्कतेचा उपाय म्हणून जिल्ह्यात हाय अलर्ट जाहीर केला आहे. पोलिसांना दक्ष राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Web Title: High alert on the sea shore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.