सुश्रुषा हाॅस्पिटलतर्फे हेल्पिंग हॅण्डला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST2021-07-05T04:20:17+5:302021-07-05T04:20:17+5:30

अडरे : आमदार शेखर निकम यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या हेल्पिंग हॅण्ड या उपक्रमाला सुश्रुषा डी. सी. एच. सी.तर्फे १० ...

Helping Hand by Sushrusha Hospital | सुश्रुषा हाॅस्पिटलतर्फे हेल्पिंग हॅण्डला मदत

सुश्रुषा हाॅस्पिटलतर्फे हेल्पिंग हॅण्डला मदत

अडरे : आमदार शेखर निकम यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या हेल्पिंग हॅण्ड या उपक्रमाला सुश्रुषा डी. सी. एच. सी.तर्फे १० हजार रुपयांची मदत देण्यात आली. यावेळी आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा तसेच हेल्पिंग हॅण्डचे मनोज जाधव, सिद्धेश लाड, विश्वनाथ कांबळे, योगेश शिर्के, आदी उपस्थित होते. हेल्पिंग हॅण्डच्या माध्यमातून कोविड रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देण्याचे काम सुरू आहे. या रुग्णालयात डॉ. अरुण पाटील, डॉ. प्रसाद खातू यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णसेवेसाठी अहोरात्र कार्यरत आहे. या रुग्णालयात आठ आय. सी. यू. बेड, दहा ऑक्सिजन बेड, सहा सामान्य बेड उपलब्ध करण्याबरोबरच विविध सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Web Title: Helping Hand by Sushrusha Hospital