नुकसानग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST2021-08-29T04:30:27+5:302021-08-29T04:30:27+5:30
खेड : तालुक्यातील शेल्डी, कासई व खोपी, (अवकिरे/ गोरेवाडी) येथील अतिवृष्टीत नुकसान झालेल्या समाजबांधवांना रत्नागिरीतील महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन ...

नुकसानग्रस्तांना मदत
खेड : तालुक्यातील शेल्डी, कासई व खोपी, (अवकिरे/ गोरेवाडी) येथील अतिवृष्टीत नुकसान झालेल्या समाजबांधवांना रत्नागिरीतील महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाच्यावतीने अन्नधान्य कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी रामचंद्र आखाडे, रूपेश गोरे आदी उपस्थित होते.
बौद्धजन मंडळाची मदत
आवाशी : खेड शहरासह ग्रामीण भागातील पूरग्रस्त १५ कुटुंबियांना बौद्धजन ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. मुंबई भोमडी येथील पदाधिकाऱ्यांनी ७५ हजार रुपयांचा निधी गोळा केला. त्यानुसार ही मदत देण्यात आली. आमदार योगेश कदम यांच्याहस्ते वितरित करण्यात आली.
रक्तदान शिबिर
मंडणगड : कोरोना काळात रक्ताची वाढणारी टंचाई लक्षात घेऊन मंडणगड तालुका अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष मुबीन परकार यांच्या माध्यमातून मंडणगड तालुक्यातील शिपोळे बंदर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने आयोजित या रक्तदान शिबिरात ४१ दात्यांनी रक्तदान केले.
जैत यांना पुरस्कार
खेड : शहरातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आदी विविध क्षेत्रात कार्यरत असलेले भारतीय जनसंघटना राज्य कार्यकारिणी सदस्य आणि स्नेह अंध विद्यालय, भराडी शाळा कमिटीचे प्रभारी अध्यक्ष उत्तमकुमार जैन यांना मुंबईतील मैत्री फाऊंडेशनचा कोविड १९ वॉरिअर पुरस्कार जाहीर झाला आहे.
वाकलेले खांब जैसे थे
गुहागर : तालुक्यातील वरवेली येथील श्री हसलाई देवी मंदिर आणि सहाणेच्या मध्यभागी रस्त्यावरून गेलेल्या वीजवाहिन्या रस्त्यापासून १३ फुटाच्या अंतरावर आल्या आहेत. एस.टी. येता-जाता तिला या वाहिन्यांचा स्पर्श होऊ नये म्हणून नागरिकांनी लाकडी बांबूंचे टेकू दिले आहेत.