चिपळूण : गोवळकोट गोविंदगडावरून रेडजाई देवीची भेट घेवून मंगळवारी श्री देव सोमेश्वर व देवी करंजेश्वरीची पालखी पेठमाप भागात आली. माहेरवाशिणीचे जोरदार स्वागत करण्यात आले. आज सकाळी पेठमाप परिट आळी येथील पालख्या विसावल्या असून तेथे ओट्या भरण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे. गुरूवारी सायंकाळी वाशिष्टी नदी किनारी सीमेवर शेरणे काढण्याचा नेञदीपक सोहळा होणार आहे. यासाठी येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
चिपळूणमध्ये देवी करंजेश्वरीचे जोरदार स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 17:29 IST