ढीगभर अभियाने, प्रवासीसंख्या मात्र होतेय ऊणे

By Admin | Updated: July 31, 2014 23:22 IST2014-07-31T22:51:56+5:302014-07-31T23:22:56+5:30

गळक्या गाड्या, फुटक्या काचा... : समस्या घेऊन एस. टी. ‘प्रवासी वाढवा’ची सत्वपरीक्षा

Heavy missions, passenger wings, however, fall | ढीगभर अभियाने, प्रवासीसंख्या मात्र होतेय ऊणे

ढीगभर अभियाने, प्रवासीसंख्या मात्र होतेय ऊणे

उमेश पाटणकर - रत्नागिरी ,, जेमतेम वीस प्रवासी घेऊन चढावात लिलया मागे टाकून एखादा ट्रकचालकही सहज निघून जातो. खिडक्यांमधून पावसाचे पाणी आत येतेय म्हणून सरकून मध्ये बसावे तर डोक्यावर हमखास पाणी गळतेय, अशी परिस्थिती असणारी वाहने दिमतीला घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा रत्नागिरी विभाग प्रवासी वाढवा अभियान सुरु करीत आहे. अपुरा कर्मचारीवर्ग, वाहनांच्या सुट्या पार्टची कमतरता, दुरुस्तीकडे दुर्लक्ष आणि वारंवार कोलमडणारे वेळापत्रक यामध्ये हे अभियान वरिष्ठ अधिकाऱ्यांची सत्वपरीक्षा घेणार आहे.
दरवर्षी दि. १ आॅगस्टला एस. टी.चे प्रवासी वाढवा अभियान सुरु होते. याची तयारी किमान पंधरा दिवस आधी होते. राज्य मार्ग परिवहनचा रत्नागिरी विभाग प्रतिवर्षी जय्यत तयारीनिशी यात सहभागी होतो. मात्र, यंदाचे अभियान एस. टी.चे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी या सर्वांची सत्वपरीक्षा घेणारे ठरणार आहे. गाड्यांच्या दुरुस्तीचे साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचा एस. टी. कर्मचाऱ्यांचा दावा आहे. त्याचा फटका चालक. वाहकांना बसत आहे. अगदी काचेचाच प्रश्न घ्यावा म्हटला तरी रत्नागिरी आगारात किमान चार ते पाच गाड्या अशा आहेत की, ज्यांच्या विन्डोग्लास विविध कारणांनी फुटलेल्या आहेत.
पावसात अशा फुटक्या काचांच्या गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी नेण्याची वेळ चालकांवर आली आहे. परिवर्तन प्रकारातील बसेस बसेसना भली मोठी अखड विन्डग्लास वापरली गेली आहे. यातील एका बसची काच वरपासून खालपर्यंत अखंड फुटली आहे.
पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून प्लास्टिक टेप लावून चिकटवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. मात्र, प्रवासादरम्यान बसणाऱ्या हादऱ्यांमुळे फुटलेली ही काच रबरामधून सरकली असून, केव्हाही निसटण्याची शक्यता आहे., अशी या बसची अवस्था असल्याचे दिसून येते.
अतिवेगाने अपघात होतात म्हणून एस. टी.च्या अधिकाऱ्यांनी सर्वच गाड्या स्पीडलॉक केल्या आहेत. यासाठी अ‍ॅक्सिलेटर पायडलखाली जाडे नटबोल्ट चक्क वेल्डिंग करुन कायमस्वरुपी बसवले आहेत. यामुळे बसेसना पुरेशी गती मिळेनाशी झाली आहे. गाडी रिकामी असली तरी लहान सहान चढावात स्पेशल गिअरचा वापर करावा लागतो.
गाड्यांच्या दुरुस्तीकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने वर्कशॉपमधून आलेली गाडी अनेकदा पहिल्याच पावसात नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांचाही खोळंबा होत असल्याचे दृश्य जागोजागी दिसत आहे. त्यामुळे कर्मचारीही हतबल झाले आहेत.

Web Title: Heavy missions, passenger wings, however, fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.