आरोग्य तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST2021-07-18T04:22:57+5:302021-07-18T04:22:57+5:30

खेड : लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि खेड तालुका आरोग्य विभाग यांच्या साैजन्याने वाडी जैतापूर व बेलदार येथे ...

Health check-up camp | आरोग्य तपासणी शिबिर

आरोग्य तपासणी शिबिर

खेड : लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि खेड तालुका आरोग्य विभाग यांच्या साैजन्याने वाडी जैतापूर व बेलदार येथे अँटिजन चाचणी व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ५० नागरिकांची आरोग्य तपासणी व अँटिजन चाचणी करण्यात आली.

रूग्णसंख्येत घट

पावस : परिसरातील रुग्णसंख्येत घट झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या तीन महिन्यांत रुग्णसंख्या हजाराच्यावर गेली होती. मात्र, जुलैपासून रुग्णसंख्येत घट होण्यास सुरूवात झाली आहे. एक हजार १०६ जण उपचार घेऊन परतले आहे. सध्या ३५ रूग्ण उपचार घेत असून, रुग्णसंख्या घटू लागली आहे. ती लवकरच शून्यावर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शाळा परिसरात वृक्षारोपण

खेड : तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलच्या परिसरात ज्येष्ठ निरुपणकार डाॅ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून वृक्षाराेपण करण्यात आले. यावेळी संस्था पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.

शैक्षणिक साहित्य वाटप

दापोली : कोकणभूमी मराठा समृध्दी प्रतिष्ठानतर्फे दि. २४ जुलै रोजी शिरवणे शाळेत सकाळी १० वाजता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. युवा मराठा नेते विशाल राजेभोसले यावेळी शिवचचरित्रावर व्याख्यान देणार आहेत.

रस्त्याची दुरवस्था

लांजा : तालुक्यातील केळवली फाटा येथील चिंचुर्टी धावडेवाडीमार्गे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्याची चाळण झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. धावडेवाडी कड्याजवळ रस्त्याची मोरी खचून रस्त्याच्या एका बाजूचा भाग खचला आहे.

प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

लांजा : शहरातील कुलकर्णी-काळे छात्रालयामध्ये सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी आठवी ते बारावी तसेच आयटीआयपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने वसतिगृह सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे.

बांधकामासाठी मुदतवाढ

रत्नागिरी : रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक हायटेक उभारण्यात येणार असून, पाच वर्षांपासून त्याचे कामकाज रखडले आहे. मात्र, जीएसटीसह वाढीव दराचा प्रस्ताव ठेकेदाराने महामंडळाकडे दिला आहे. तरीही येत्या दोन वर्षांत कामकाज पूर्ण होणे शक्य नाही, त्यामुळे आणखी मुदतवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे.

खड्डे बुजविणे सुरू

रत्नागिरी : शहरातील रस्त्यांची चाळण झाली असून, वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. रस्त्याबाबत नागरिक, वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भारतीय जनता पक्षातर्फे काही ठिकाणचे खड्डे बुजविण्यात आले आहेत. शिवाय नगर परिषद प्रशासनाकडूनही खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

सेलसाठी गर्दी

रत्नागिरी : कोरोनामुळे चाैथ्या टप्प्यातील शासकीय निर्बंध लागू असतानाही काही व्यावसायिकांकडून राजरोस नियमांचे उल्लंघन करून विक्री सुरू आहे. काही कापड विक्रेत्यांनी मान्सून सेल ऑफर जाहीर केली असून, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. कोरोनाकाळात गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केले जात आहे.

Web Title: Health check-up camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.