रत्नागिरी जिल्ह्यात गणपती सणासाठी २८ ठिकाणी आरोग्यपथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 17:44 IST2017-08-14T17:44:00+5:302017-08-14T17:44:13+5:30
रत्नागिरी : गौरी गणपतीसाठी मुंबईहून चाकरमानी या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येतात. मुंबई, पुणे येथे स्वाईन फ्ल्यू, डेंग्यु, मलेरिया हे आजार मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू, कॉलरा, गॅस्ट्रो, काविळ, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू या रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्ह्यात बसस्थानक, रेल्वे स्थानक तसेच जिल्ह्याच्या सीमेवर वैद्यकीय तपासणी व माहिती केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात २८ ठिकाणी आरोग्य पथके तैनात करण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गणपती सणासाठी २८ ठिकाणी आरोग्यपथके
रत्नागिरी : गौरी गणपतीसाठी मुंबईहून चाकरमानी या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येतात. मुंबई, पुणे येथे स्वाईन फ्ल्यू, डेंग्यु, मलेरिया हे आजार मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू, कॉलरा, गॅस्ट्रो, काविळ, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू या रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्ह्यात बसस्थानक, रेल्वे स्थानक तसेच जिल्ह्याच्या सीमेवर वैद्यकीय तपासणी व माहिती केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात २८ ठिकाणी आरोग्य पथके तैनात करण्यात येणार आहे.
कर्मचाºयांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन कॉलरा, गॅस्ट्रो, काविळ, लेप्टोस्पायरोसीस, डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्यास औषधोपचार करण्यात येणार आहे. याचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात येणार असून सर्वांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यामध्ये सर्वत्र वैद्यकीय पथके तैनात करण्यात आलेली आहेत. २२ आॅगस्ट रोजी सकाळी कार्यरत होईल. २४ आॅगस्टपर्यंत सलग कार्यरत राहील. ही पथके २८ आॅगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत पथके कार्यरत असतील.
मंडणगड एसटी स्टँड, दापोली एसटी स्टँड, कशेडी घाट चेकपोस्ट, भरणेनाका चेकपोस्ट, खेड रेल्वे स्अेशन, शृंगारतळी एसटी स्टँड, परशुराम घाट, चिपळूण स्टँड, वालोपे रेल्वे स्टेशन, बहादूर शेख नाका, वहाळ फाटा, संगमेश्वर रेल्वे स्टेशन, आरवली चेकपोस्ट, साखरपा स्टँड, संगमेश्वर चेकपोस्ट, देवरुख फाटा बावनदी चेकपोस्ट, रत्नागिरी रेल्वे स्टेशन, हातखंबा तिठा, पाली चेकपोस्ट, वेरळ चेकपोस्ट, लांजा हायस्कूल समोर चेकपोस्ट, लांजा एसटी स्टँड, आडवली रेल्वे स्टेशन, निवसररेल्वे स्टेशन, विलवडे रेल्वे स्टेशन, फुपेरे रेल्वे स्टेशन, ओणी चेकपोस्ट, राजापूर जकातनाका येथे कार्यरत राहणार आहेत.