गेले ते शिवसैनिकच नव्हते : प्रकाश कुवळेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST2021-07-07T04:39:20+5:302021-07-07T04:39:20+5:30

राजापूर : तालुक्यातील सागवे, मिठगवाणे, कुंभवडे, अणसुरे, तारळ भागातील शिवसैनिकांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. सागवे विभागातील एका माजी विभागप्रमुखाने ...

He was not a Shiv Sainik: Prakash Kuvalekar | गेले ते शिवसैनिकच नव्हते : प्रकाश कुवळेकर

गेले ते शिवसैनिकच नव्हते : प्रकाश कुवळेकर

राजापूर : तालुक्यातील सागवे, मिठगवाणे, कुंभवडे, अणसुरे, तारळ भागातील शिवसैनिकांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. सागवे विभागातील एका माजी विभागप्रमुखाने शिवसेनेचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केलेला असताना जे गेले ते शिवसैनिक नव्हते अशी सारवासारव शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी केली आहे.

प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या निषेधार्थ शिवसेनेचे सागवेचे माजी विभागप्रमुख राजा काजवे, पंढरीनाथ आंबेरकर, सुहास कुवरे यांसह या भागातील शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याबाबत प्रकाश कुवळेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जे गेले ते शिवसैनिक नव्हते त्यांची यापूर्वीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती, असे सांगितले. राजा काजवे यांनी हकालपट्टीनंतरही शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीसह अनेक कार्यक्रमांना जाहीर व्यासपीठावर हजेरी लावली. तेव्हा ते कोण होते या प्रश्नावर तालुकाप्रमुखांकडे कोणतेही उत्तर नव्हते. ते त्यावेळी आमदारांना भेटण्यासाठी आले होते, त्यांचा शिवसेनेशी संबंध नव्हता असे उत्तर देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न कुवळेकर यांनी केला. या पत्रकार परिषदेला विभागप्रमुख नरेश दुधवडकर, पंचायत समिती सदस्य प्रशांत गावकर, उमेश पराडकर उपस्थित होते.

Web Title: He was not a Shiv Sainik: Prakash Kuvalekar