शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या मोबदल्यासाठी 'तो' चक्क मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरच झोपला, गुन्हा दाखल

By संदीप बांद्रे | Updated: May 10, 2023 18:40 IST

वारंवार पत्र व्यवहार करूनही दखल घेतली जात नसल्याने आक्रमक भुमिका घेत महामार्गावर ठिय्या मांडला. 

चिपळूण : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी खासगी जागेत अतिक्रमण करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग तसेच महसूल विभागाकडे तक्रार करून देखील दखल घेतली नाही. त्यामुळे खेर्डी येथील नयनेश भालचंद्र दळी याने कामथे येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा निर्माण केला. शिवाय कामथे येथे भर उन्हात राष्ट्रीय महामार्गावर झोपून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दळी यास पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कामथे हरेकरवाडी येथे महामार्गालगत जमिन आहे. या जागेचा न्यायालयीन वाद सुरू आहेत. याच ठिकाणी संपादीत जागेत संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू होते. नयनेश दळी यांनी आपल्या जागेत राष्ट्रीय महामार्ग विभागाने अतिक्रमण केल्यामुळे  बुधवारी सकाळी संरक्षक भिंतीसाठी उभारलेले बांधकाम  साहित्य काढून टाकले. यावरून ठेकेदार कंपनी व दळी यांच्यात बाचाबाची झाली. वारंवार पत्र व्यवहार करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे दळी याने आक्रमक भुमिका घेत महामार्गावर ठिय्या मांडला. भर उन्हात सकाळी ११.३०च्या सुमारास मुबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मधोमध झोपून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. तब्बल २५ मिनीटे तो रस्त्यावर झोपूनच होता. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूने वाहने थांबली होती. याबाबतची माहिती मिळताच येथील पोलिस निरीक्षक रविंद्र शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दळी याला रस्त्यातून बाजूला होण्यास सांगितले. परंतू दळी याने नकार देत आपल्याच जागेत महामार्ग विभागाने अतिक्रमण केले आहे. तेथे सरंक्षण भिंतीचे काम सुरू असून ते काढण्यात यावे, अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रीय महामार्गचे कनिष्ठ अभियंता श्याम  खुणेकर यांनी सविस्तर माहिती दिली. संपादीत जागेतच संरक्षण भिंतीचे काम सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतरही दळी रस्त्यावरून हटण्यास तयार नव्हता. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या घटनेची फिर्याद राष्ट्रीय महामार्ग चिपळूण विभागाकडून देण्यात आली आहे.  त्याप्रमाणे त्याच्या विरूद्ध शासकीय कामात अटकाव केल्याने व महामार्ग रोखल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राठोड अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गCrime Newsगुन्हेगारी