महिलेच्या बॅगमधून सव्वालाखाचे सोन्याचे दागिने लांबवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:35 IST2021-09-21T04:35:27+5:302021-09-21T04:35:27+5:30

राजापूर : तालुक्यातील जुवे येथे वर्षश्राद्धासाठी आलेल्या महिलेच्या बॅगमधून अज्ञाताने १ लाख ३१ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले. ...

He removed the gold ornaments from the woman's bag | महिलेच्या बॅगमधून सव्वालाखाचे सोन्याचे दागिने लांबवले

महिलेच्या बॅगमधून सव्वालाखाचे सोन्याचे दागिने लांबवले

राजापूर : तालुक्यातील जुवे येथे वर्षश्राद्धासाठी आलेल्या महिलेच्या बॅगमधून अज्ञाताने १ लाख ३१ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले. याप्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही घटना शनिवार, १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ ते रविवार, १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. या कालावधीत घडली आहे.

याबाबत नीता तुळशीदास करंजे (२९, मूळ रा. कल्याण ईस्ट सध्या रा. जुवे-जैतापूर, ता. राजापूर) यांनी नाटे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार त्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी घरी आल्या असता, घरातील जेवण खोलीच्या बाजूला असलेल्या बाथरुमजवळ ठेवलेल्या त्यांच्या बॅगमधून अज्ञाताने त्यांचे दागिने लांबवले. ज्यात ११ ग्रॅमचे सोन्याचे मणी माळ, ७ ग्रॅमची सोन्याची चेन, ५ ग्रॅमचे सोन्याचे कानातील दोन जोड, ६ ग्रॅमची सोन्याची चेन, १७ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, २ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण १ लाख ३१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने लांबवला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.

Web Title: He removed the gold ornaments from the woman's bag