शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

फोन आला अन् त्याने घेतली तिसऱ्या मजल्यावरून उडी; चिपळुणातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 19:08 IST

चिपळूण : एक फोन आला आणि त्यावर झालेल्या संभाषणानंतर १९ वर्षीय युवकाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ...

चिपळूण : एक फोन आला आणि त्यावर झालेल्या संभाषणानंतर १९ वर्षीय युवकाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना २६ जानेवारी रोजी रात्री शहरातील भोगाळे येथील परशुराम प्लाझा इमारतीमध्ये घडली आहे. रोहन दुर्योधन नेताम (१९, रा. जि. गोंदिया) असे या युवकाचे नाव आहे.रोहन आणि त्याचा मित्र परशुराम प्लाझा येथे राहात होते. रोहन चिपळूणमध्ये नोकरीला होता. इमारत बांधकामात मजुरीचे काम तो करत असे. २६ जानेवारीला रात्री राेहन आणि त्याचा मित्र रूममध्ये बसले होते. त्यावेळी रोहनला कोणाचा तरी फोन आला. फोनवर झालेल्या संभाषणानंतर त्याने आपला मोबाइल लादीवर जोराने आपटला आणि रागाच्या भरात बाल्कनीमध्ये जाऊन तिसऱ्या मजल्यावरून थेट उडी मारली. तो तेथेच गतप्राण झाला.या घटनेनंतर परिसरातील नागरिक गोळा झाले. तत्काळ चिपळूण पोलिसांना त्याची खबर देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ त्याला रुग्णालयात हलविले. मात्र, तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याप्रकरणी चिपळूण पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. त्याला आलेला फोन कोणाचा होता आणि त्यावर असे काय संभाषण झाले की ज्यामुळे त्याने रागाने आत्महत्या केली, याचा तपास पोलिस करत आहेत. मोबाईलचे रेकॉर्ड तपासल्यानंतर ते स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण