भावंडांना दुसऱ्या घरी पाठवून त्याने संपविले स्वत:चे आयुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST2021-06-18T04:22:37+5:302021-06-18T04:22:37+5:30

राजापूर : ‘दुसऱ्या घरी जा, मला झाेपायचे आहे’, असे सांगून लहान भावंडांना दुसऱ्या घरी पाठवून १७ वर्षीय विवेक विठाेबा ...

He ended his life by sending his siblings to another house | भावंडांना दुसऱ्या घरी पाठवून त्याने संपविले स्वत:चे आयुष्य

भावंडांना दुसऱ्या घरी पाठवून त्याने संपविले स्वत:चे आयुष्य

राजापूर : ‘दुसऱ्या घरी जा, मला झाेपायचे आहे’, असे सांगून लहान भावंडांना दुसऱ्या घरी पाठवून १७ वर्षीय विवेक विठाेबा काकये या युवकाने स्वत:चे आयुष्य संपविल्याची हृदयद्रावक घटना माेराेशी - काकयेवाडी (ता. राजापूर) येथे बुधवारी घडली़. याप्रकरणी राजापूर पाेलीस स्थानकात नाेंद करण्यात आली असून, विवेकच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

राजापूर पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेकच्या आई - वडिलांचे निधन झाले आहे. तो आपल्या घरी पंधरा वर्षीय छोटी बहीण व दहा वर्षीय छोट्या भावासह राहत होता. विवेक माेठा असल्याने बारीकसारीक कामे करून ताे उदरनिर्वाह करत हाेता. त्याची दोन्ही भावंडे जावडे (ता. लांजा) येथील छात्रालयात होती. मात्र, कोरोनामुळे गेले काही महिने ते मोरोशीला घरी परत आले होते.

विवेकने बुधवारी दुपारी २ ते ३.५० यावेळात आपल्या दोन्ही भावंडांना दुसऱ्या घरी जा, मला येथे झोपायचे आहे, असे सांगून दोन्ही भावंडांना दुसऱ्या घरी पाठविले. भावंड घरातून जाताच विवेकने स्वत:च्या घरात ओढणीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. काहीवेळाने त्याची बहीण घरी आली असता, तिच्या हा प्रकार लक्षात आला व तिने हंबरडा फाेडताच एकच गोंधळ उडाला. दरम्यान, विवेकचा चुलतभाऊ महेश बाबू काकये याने राजापूर पोलीस स्थानकात याबाबत माहिती दिली. पाेलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद वाघाटे अधिक तपास करत आहेत.

Web Title: He ended his life by sending his siblings to another house