हर्दखळेचे पोलीस पाटील ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:02 PM2019-01-28T23:02:02+5:302019-01-28T23:02:06+5:30

साखरपा : रत्नागिरी-कोल्हापूर राष्टÑीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील मेढे येथे कार झाडावर आदळून एकजण ठार तर दोघे जखमी झाले. जयवंत ...

Harshhale Police Patil killed | हर्दखळेचे पोलीस पाटील ठार

हर्दखळेचे पोलीस पाटील ठार

Next

साखरपा : रत्नागिरी-कोल्हापूर राष्टÑीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील मेढे येथे कार झाडावर आदळून एकजण ठार तर दोघे जखमी झाले. जयवंत पांचाळ (५०) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते लांजा तालुक्यातील हर्दखळे येथील पोलीस पाटील आहेत. पांचाळ यांचा मुलगा प्रणय आणि प्रकाश पाटील हे हर्दखळे येथील शिक्षक गंभीर जखमी आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेढे बसथांब्यापासून काही अंतरावर मारुती अल्टो ८०० गाडी (एमएच-१०-सीए-९१०४) ही गाडी आंब्याच्या झाडावर जोरदार आदळली. त्यात हर्दखळे येथील पोलीस पाटील जयवंत पांचाळ हे जागीच ठार झाले. प्रकाश दत्तू पाटील (५४) हे हर्दखळेमधील शिक्षक ही गाडी चालवत होते. त्यांच्यासह जयवंत पांचाळ यांचा मुलगा प्रणय पांचाळ (१०) या अपघातात जखमी झाले. हे सर्वजण इस्लामपूर येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी गेले होते तेथून परत येत असताना हा अपघात झाला.
अपघाताचे वृत्त समजताच मेढे ग्रामस्थांनी त्वरित धाव घेऊन गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढले. जयवंत पाटील यांचा जागीच मृत्यू झाला होता. प्रकाश पाटील आणि प्रणय पांचाळ यांना उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले. मात्र, दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाकडे हलविण्यात आले.
यावेळी कोंडगावचे पोलीस पाटील मारुती शिंदे, मराठी पत्रकार संघाचे संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष संतोष पोटफोडे अनेकांनी जखमींना हलविण्यामध्ये पुढाकार घेतला. पोलीस उपनिरीक्षक विक्रम पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
प्रकाश पाटील यांना कोल्हापूरला हलविले
प्रकाश पाटील यांची प्रकृती अधिकच गंभीर झाल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीहून कोल्हापूरला पाठविण्यात आले आहे. प्रणय रत्नागिरीत दाखल असून त्याची प्रकृती सुधारत आहे.

Web Title: Harshhale Police Patil killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.