शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

हापूसच्या माहेरघरी आलाय आफ्रिकेतील हापूस, रत्नागिरीत ‘मलावी हापूस’ची चर्चा 

By मेहरून नाकाडे | Updated: December 22, 2022 13:25 IST

गेल्या पाच वर्षांपासून मलावी आंब्याची आवक भारतात होत आहे.

मेहरुन नाकाडेरत्नागिरी : हापूस आंब्याचे मूळ घर म्हणून परिचित असलेल्या रत्नागिरीत सध्या पूर्व आफ्रिकेतील ‘मलावी हापूस’ आंब्याची चर्चा सुरू झाली आहे. १४ ते १५ आंबे असलेला एक खोका चार ते पाच हजार रुपये दराने विकण्यात येत आहे. आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक खोक्यांची जिल्ह्यात विक्री झाली आहे. दर कडकडीत असतानाही केवळ हापूसची भुरळ असणारे खवय्ये अधिक पैसे मोजत आहेत.दरवर्षी वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये फेब्रुवारीत हापूस आंब्याची आवक सुरु होते. त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आवक वाढून मुख्य हंगाम जोर पकडतो. यावर्षी अद्याप आंब्याला पालवी असून, किरकोळ मोहोर सुरू झाला आहे. थंडीही गायब आहे. त्यामुळे एकंदर आंब्याचे उत्पादन कमीच राहणार असल्याचे बागायतदार सांगत आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंब्याची पहिली पेटी बाजारात गेली असली तरी हापूसचा मुख्य हंगाम सुरु होण्यात अजून बराच अवधी आहे. यंदा आंब्याचे उत्पादन कमीच राहणार असल्याचे जाणकार सांगत आहेत. परतीच्या पावसानेही हापूसला दणका दिला आहे. एकीकडे स्थानिक हापूस लांबणीवर पडणार असल्याचे दिसत असताना मलावी या आफ्रिकन देशातील हापूस रत्नागिरी बाजारपेठेत दाखल झाला आहे.कसा आहे मलावी देश?

  • मलावी हा पूर्व आफ्रिकेतील गरीब आणि अविकसित देश आहे. त्याची लोकसंख्या दीड कोटींच्या आसपास आहे. या देशाच्या दोन बाजूंना टांझानिया, एका बाजूला झांबिया तर इतर बाजूंना मोझांबिक हे देश आहेत. मलावी मधील हवामान कोकणासारखे आहे.
  • २०११ साली मलावीतील काही शेतकऱ्यांनी भारतात येऊन कोकणातून आंब्याची कलमे नेऊन ४५० एकर जमिनीवर लागवड केली होती. नोव्हेंबरपर्यंत या आंब्याची आवक होते. यावर्षी तेथील हंगामही लांबला आहे.
  • गेल्या पाच वर्षांपासून मलावी आंब्याची आवक भारतात होत आहे. तेथे आंब्याचा हंगाम ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये असतो. त्यावेळी रत्नागिरी, देवगड हापूस बाजारात नसतो. कोकणपट्ट्यातील विविध भागातून हापूस आंबा जानेवारीनंतर बाजारात येतो. त्यामुळे कोकणातील हापूसला मलावी आंब्याचा फटका बसत नाही.

इंधनाचे दर वाढल्यामुळे हवाई वाहतूक महाग झाली आहे. त्यासह आयात आणि अन्य करांमुळे आंब्याचे दर वाढले आहेत. एका खोक्यामध्ये १४ ते १५ आंबे असतात. चार ते पाच हजार रुपये दराने बाॅक्सची सुरू आहे. आतापर्यंत माझ्या स्टाॅलवर ४० बाॅक्सची विक्री केली आहे. - रमेश श्रीनाथ, फळविक्रेता, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा