शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर हापूस बाजारात दाखल, बदलत्या हवामानामुळे उत्पादनात घट; दर काय.. जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 13:04 IST

राज्याच्या अनेक भागांतून आंबा आल्याने वाशी मार्केटला आवक वाढली

रत्नागिरी : बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा पिकावर झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा काही भागांतच आहे. उष्म्यामुळे आंबा लवकर तयार होऊ लागल्याने बागायतदार आंबा काढून विक्रीला पाठवीत आहेत. त्यामुळे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर वाशी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर हापूस दाखल झाला.

बुधवारी वाशी मार्केटला ५० हजार पेट्या विक्रीला आल्या होत्या. गतवर्षी गुढी पाडव्याला वीस हजार पेट्या विक्रीला होत्या. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आवक अधिक असून, दर ५०० रुपयांनी कमी झाला आहे. सध्या पेटीला १५०० ते ४५०० रूपये दर मिळत आहे.यावर्षी पावसाळा बराच लांबला. त्यामुळे उशिरापर्यंत झाडांना पालवी येत राहिली. यावर्षी थंडीचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे फुलोरा पाहिजे तेवढा झाला नाही. जानेवारीतील थंडीमुळे झाडांना फुलोरा आला. मात्र, फळधारणा अपेक्षेइतकी झाली नाही. जिल्ह्यात पावस, राजापूर, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा अधिक आहे. मात्र, जिल्ह्याच्या अन्य भागांत आंबा नसल्याने बागायतदार चिंतेत आहेत. आंब्यावर कीडरोड, तुडतुडा, बुरशी, थ्रीप्सचा प्रादुर्भाव अद्याप आहे.फुलोरा आल्यापासून वानरांचा त्रास सुरू होतो. त्यामुळे राखणीसाठी नेपाळी बागेत ठेवले जातात. काही बागायतदारांकडे आंबाच नसल्याने कीटकनाशक फवारणीपासून राखणीसाठी केलेला खर्च भागविणे अशक्य होणार आहे.गुढी पाडव्याला मुहूर्तगुढी पाडव्याला मुहूर्ताची आंबा पेटी पाठवून कोकणातील बागायतदार आंबा विक्रीची सुरुवात करतात. दरवर्षी वाशी बाजार समितीत ५० ते ६० हजार पेट्या विक्रीला असतात. गतवर्षी हे प्रमाण कमी होते. २० हजार पेट्याच विक्रीला होत्या. यावर्षी पेट्या वाढल्या आहेत. अर्थात त्यात अजूनही कोकणातील आंबा कमी आहे.

आंबा हंगामाचे चित्रच वेगळे आहे. दरवर्षी सुरुवातीला आंबा कमी असतो. मात्र, यावर्षीही मोजक्याच बागायतदारांकडे आंबा आहे, अन्य बागायतदारांकडे कामच नसल्याने ते बसून आहेत. पाडव्याला राज्याच्या अनेक भागांतून आंबा आल्याने वाशी मार्केटला आवक वाढली होती. - राजन कदम, बागायतदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाweatherहवामानMarketबाजार