हापूसचा हंगाम संपला आता मद्रासी आंबा
By Admin | Updated: June 15, 2014 00:35 IST2014-06-15T00:34:45+5:302014-06-15T00:35:17+5:30
दरामध्ये चढउतार : स्थानिकांसाठी कोकणचा राजा ठरला गोड

हापूसचा हंगाम संपला आता मद्रासी आंबा
सावर्डे : गेले तीन महिने जिल्ह्यात ठिकठिकाणी, चौकाचौकात दिसणारा स्थानिक हापूस आंब्याचा सिझन आता संपला आहे. त्यामुळे बाजारातील हापूस आंबा गायब झाला असून, त्याची जागा मद्रासी व बेंगलोरी आंब्याने घेतली आहे.
येथील बाजारपेठेत यंदा हापूसची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. सुरुवातीला आंब्याचे दर महागले होते. परंतु, दोनदा मध्येच पाऊस आल्याने आंब्याचे दर थोडेसे उतरले. त्यामुळे स्थानिकांनी आंबा कमी दराने मोठ्या प्रमाणात विकले. त्यातच परदेशी विक्रीलाही काही प्रमाणात आळा बसल्याने येथे सर्वत्र मोेठ्या प्रमाणात आंबा उपलब्ध होता. यामुळे शेकडा १ हजार ते २ हजार रुपयांचा आंबा काही प्रमाणात ८०० रुपयेवर येऊन थांबला होता. मात्र, पावसाळा सुरु झाल्याने चारवेळा मुसळधार पाऊस व वारे पडल्याने शेतकऱ्यांना आता त्यांचे आंबे संपवले आहेत. परिणामी त्यांची जागा मद्रासी व बेंगलोरी आंब्याने घेतली आहे. २०० ते ३०० रुपये दराने किंवा फळाच्या आकारानुसार हा आंबा विकला जात आहे. विमल, तोतापूरी, मद्रास, सिंदुरी या नावाने बेंगलोरचे तसेच मद्रासहून येथे आंबे दाखल झाले आहेत. (वार्ताहर)