शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात दीड लाखाचा गुटखा जप्त, दाेघे व्यापारी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 17:52 IST

या कारवाईत अंदाजे ४ लाख किंमतीचे एक चारचाकी वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे

राजापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि राजापूर पोलिसांनी राजापूर शहरातील दोन व्यापाऱ्यांवर धाड टाकून सुमारे १ लाख ३६ हजार २७० रुपयांचा गुटखा हस्तगत केला आहे. या कारवाईनंतर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. या कारवाईत अंदाजे ४ लाख किंमतीचे एक चारचाकी वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे.जवाहर चौकातील दुकानदार असीम अब्दुल रझ्झाक डोसानी आणि लियाकत शौकत सय्यद अशी अटक केलेल्या दोघा व्यापाऱ्यांची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि राजापूर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत असीम अब्दुल रझ्झाक डोसानी याच्याकडे १ लाख ३२ हजाराचा तर लियाकत शौकत सय्यद याच्याकडे ४ हजार २७० रुपयांचा विविध कंपन्याचा गुटखा आढळला. दरम्यान, सापडलेला सर्व माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. दोन्ही दुकानदारांविरुध्द भारतीय दंड विधान कलम २७२,२७३ आणि ३२८ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.यामध्ये असीम अब्दुल रझ्झाक डोसानी प्रकरणी राजापूरचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर तर लियाकत शौकत सय्यद प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाघाटे तपास करीत आहेत.पाेलिसांनी अटक केलेल्या दोन्ही व्यापाऱ्यांना येथील दिवाणी न्यायालयात हजर केले असता असीम अब्दुल रझ्झाक डोसानीला २८ फेब्रुवारीपर्यंत तर लियाकत शौकत सय्यद याला २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी