गुरव समाजाचा मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:31 IST2021-03-17T04:31:41+5:302021-03-17T04:31:41+5:30

रत्नागिरी : येथील रत्नागिरी गुरव ज्ञाती समाज भवन येथे गुरव समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने श्री ...

Gurav Samaj's gathering in excitement | गुरव समाजाचा मेळावा उत्साहात

गुरव समाजाचा मेळावा उत्साहात

रत्नागिरी : येथील रत्नागिरी गुरव ज्ञाती समाज भवन येथे गुरव समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा, महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ पार पडले.

मेळाव्याचे उद्घाटन मुख्य कमिटी अध्यक्ष शैलेश हेदवकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. सचिव अनंत गुरव, सहसचिव किशोर गुरव, सोनू गुरव (विश्वस्त), मोतीराम गुरव, विलास गुरव, विवाह प्रमुख सुरेश राणे उपस्थित होते.

यावेळी रत्नागिरी वधू-वर सूचक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. विवाह कमिटीवर प्रकाश गुरव (नेवरे), सुधाकर गुरव (गुहागर), विलास गुरव (आंबेड), महेंद्र गुरव (सोनवडे), विवाह प्रमुख शांताराम गुरव (ओरी), मदतनीस प्रशांत गुरव (वरवडे), दीपक गुरव (वळके), रोशन गुरव (नाणीज), किशोर गुरव (नाणिज), नितीन गुरव (मिरजोळे), संजना गुरव (मिरजोळे), मुग्धा गुरव (भिरकोंड), प्रगती गुरव (नेवरे) रिद्धी गुरव (नेवरे), नेहा गुरव (वळके) यांची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Gurav Samaj's gathering in excitement