भातपिकावरील राेगांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:32 IST2021-09-03T04:32:20+5:302021-09-03T04:32:20+5:30
दापाेली : कोकणातील भातपिकावर अनेक किडी व रोग एकाचवेळी येण्याची शक्यता असते. याबाबत काेकण कृषी विद्यापीठातील विद्यार्थिनींनी भातपिकावरील ...

भातपिकावरील राेगांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
दापाेली : कोकणातील भातपिकावर अनेक किडी व रोग एकाचवेळी येण्याची शक्यता असते. याबाबत काेकण कृषी विद्यापीठातील विद्यार्थिनींनी भातपिकावरील किडी व राेगांवर कसे नियंत्रण ठेवावे, उपाययाेजना याबाबत मार्गदर्शन केले.
काेकण कृषी विद्यापीठाच्या बी. एस्सी. ॲग्रीच्या विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते. भातपिकासाठी सुधारित जातींची निवड कशी करावी, माती परीक्षण, बीजप्रक्रिया, खतांचे योग्य व्यवस्थापन, जैविक पद्धतीने रोग नियंत्रण कसे करावे, कीटकनाशक फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, विषबाधा झाल्यास कोणते प्रथमोपचार करावेत याविषयीची माहिती शेतकऱ्यांना दिली. या कार्यक्रमाला गावचे अध्यक्ष रमेश खळे, नरेश खळे, विनायक ठोंबरे, विलास ठोंबरे उपस्थित होते. कोकणातील शेतकरी वर्षानुवर्षे भातपीक घेत आहे. त्याला भात पिकावर येणारे रोग आणि किडी या तर माहीत असतात. पण रोग व किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या कोणत्या उपाययोजना कराव्यात, हे माहीत नसते. शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दिल्याबद्दल रमेश खळे यांनी ऐश्वर्या भेकरे, सिद्धी रसाळ, रिंकी खळे यांचे आभार मानले.