आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST2021-08-22T04:34:07+5:302021-08-22T04:34:07+5:30
देवरूख : जागतिक छायाचित्रण दिनानिमित्ताने आठल्ये - सप्रे - पित्रे महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयाेजन करण्यात आले हाेते. ग्रंथालय ...

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात मार्गदर्शन
देवरूख : जागतिक छायाचित्रण दिनानिमित्ताने आठल्ये - सप्रे - पित्रे महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयाेजन करण्यात आले हाेते. ग्रंथालय व प्रसिद्धी विभागाने या कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते.
ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी फोटोग्राफीमधील करिअरच्या संधी, फोटोग्राफीची उपयुक्तता व महत्त्व याबाबत माहिती दिली. यावर्षीच्या फोटोग्राफी दिनाच्या थीमबाबतही माहिती दिली. यावर्षीची थीम पेंडमीक लॉकडाऊन ‘थ्राे दि लेन्स’ म्हणजेच लेन्सच्या माध्यमातून महामारीचं लॉकडाऊन असल्याचे सांगितले. प्रा. धनंजय दळवी यांनी फोटोग्राफीमध्ये झालेल्या क्रांतीचा आढावा घेतला. जगामध्ये फोटोग्राफी कलेत व्यावसायिकता येऊन क्रांती घडून आल्याची माहिती प्रा. दळवी यांनी दिली.
प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांची अंगभूत कौशल्य विकसित होण्यासाठी विविध कलाविषय कार्यक्रम महाविद्यालयात नेहमीच आयोजित केले जातात. या उपक्रमाचा हेतू विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर आपल्या करिअरसाठी उपयुक्त छंदाचा उपयोग करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा, असा असल्याचे सांगितले.