गुहागरात डॉक्टर्सनीही हाती घेतली झाडू
By Admin | Updated: November 11, 2014 23:16 IST2014-11-11T21:47:12+5:302014-11-11T23:16:26+5:30
गुहागर वरचापाट येथील खरे संकुल परिसरमध्ये स्वच्छता मोहीम राबवली.

गुहागरात डॉक्टर्सनीही हाती घेतली झाडू
गुहागर : भारत स्वच्छ अभियानांतर्गत गुहागर तालुक्यात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. गुहागर शहरातील डॉक्टरांनीही यामध्ये पुढाकार घेऊन गुहागर वरचापाट येथील खरे संकुल परिसरमध्ये स्वच्छता मोहीम राबवली.
महसूल खात्यांतर्गत मंडल अधिकारी समीर देसाई, तलाठी गजानन धावडे, केंद्रप्रमुख पांडुरंग मायनाक यांच्या शासकीय विशेष पथकाच्या मार्गदर्शनाखाली वरचापाट जांगळेवाडी व इतर परिसराची स्वच्छता मोहीम आज राबवण्यात आली. यामध्ये नगरसेवक नरेश पवार, निधी सुर्वे, सुधाकर जांगळे, सुजाता बागकर, स्नेहा भागडे, दीपक सांगळे, दप्ीाक कानसरे व महिलावर्गानेही सहभाग घेतला होता.या अभियानात गुहागर शहरातील डॉक्टरांनीही पुढाकार घेत खरे संकुल नजीकचा रस्ता व परिसर स्वच्छ केला. यामध्ये डॉ. आनंद खरे, विवेक धामणस्कर, शैलेश कनगुटकर, संदीप फुणगूसकर, अनिकेत गोळे, कविश भोसले, मयुरेश बेंडल, वसंत ओक, संजय आगाशे आदींनी सहभाग घेतला. शहरात मोहीम राबविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला आहे. आज डॉक्टसर्नीही हातात झाडू घेऊन मोहीमेत भाग घेऊन स्वच्छतेचे महत्व अधोरेखित केले. यापुढे काही काळ ही मोहीम राबविण्यात येणार असून, स्वच्छतेला सवार्धिक महत्व देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)