गुहागर : गेले दहा दिवस गुहागर तालुक्यात पर्यटकांनी चांगलीच हजेरी लावलेली आहे. त्यामुळे गुहागर तालुक्यात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांचे आकर्षण अधिक असल्याने किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गुहागर समुद्र किनारी पाण्यात डुंबण्याबरोबरच वाळूत खेळणे, उंट, घोडे सवारीचा आनंद घेत आहेत.लोकसभा निवडणूक वातावरणामुळे एप्रिलअखेर तसेच १० मेपर्यंत तुरळक पर्यटक गुहागरकडे वळले होते. गेले दहा दिवस मात्र गुहागर पर्यटकांनी फुल्ल झालेले दिसत आहे. यापूर्वी पुणेमधून मोठ्या प्रमाणात पर्यटकत येत होते. आता मुंबईतूनही येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढलेली दिसून येत आहे.गुहागर - विजापूर महामार्गातर्गत चिपळूणपासून कऱ्हाड ते पाटण असे मोठ्या प्रमाणात रस्त्याचे रुंदीकरण व क्राँक्रिटीकरण काम सुरू आहे. अनेक ठिकाणी काम सुरू असल्याने अडथळे निर्माण होऊन वाहतुकीस विलंब होत असल्याने यामार्गे येणाºया सांगली, साताºयातील पर्यटकांची संख्या कमी झालेली दिसून येत आहे. मे महिन्याच्या अखेरीला आणखीन पर्यटक येण्याची चिन्ह आहेत.गुहागर समुद्र किनारी लहानग्यांबरोबरच मोठे पर्यटकही वाळूमध्ये खेळणे, पाण्यात डुंबणे, घोडा उंट सवारी, स्पीड बोट बनाना राईड, बलून राईड आदी विविध खेळाचा आनंद घेताना दिसत आहेत.
गुहागर पर्यटकांनी गजबजले, घेत आहेत उंट, घोडे सवारीचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 18:35 IST
गेले दहा दिवस गुहागर तालुक्यात पर्यटकांनी चांगलीच हजेरी लावलेली आहे. त्यामुळे गुहागर तालुक्यात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांचे आकर्षण अधिक असल्याने किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गुहागर समुद्र किनारी पाण्यात डुंबण्याबरोबरच वाळूत खेळणे, उंट, घोडे सवारीचा आनंद घेत आहेत.
गुहागर पर्यटकांनी गजबजले, घेत आहेत उंट, घोडे सवारीचा आनंद
ठळक मुद्देगुहागर पर्यटकांनी गजबजलेपर्यटक घेत आहेत उंट, घोडे सवारीचा आनंद