शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील शहीद पोलिसांना अभिवादन, स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र वाहून पालकमंत्री सामंत यांच्याकडून श्रद्धांजली 

By मनोज मुळ्ये | Updated: October 21, 2023 15:30 IST

रत्नागिरी : देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलिस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पालकमंत्री उदय सामंत यांनी स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र वाहून ...

रत्नागिरी : देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलिस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पालकमंत्री उदय सामंत यांनी स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. हवेत बंदूकीच्या तीन फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून पोलिस दलाकडून शहिदांना सलामी देण्यात आली.गेल्या वर्षभरात पोलिस दलातील ज्या पोलीस अधिकाऱ्यांना व अंमलदारांना कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झाले, त्यांच्या स्मृतीस येथील पोलिस कवायत मैदानावरील स्मृतिस्तंभास पालकमंत्री सामंत, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकणी आणि पोलिस उपअधीक्षक नीलेश माईनकर यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.पालकमंत्री सामंत यांनी यावेळी श्रद्धांजली संदेश वाचन केले. लडाख येथे केंद्रीय राखीव पोलिस दलातील १० शूर शिपायांवर २१ ऑक्टोबर १९५९ रोजी चीनच्या सशस्त्र सैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली व प्रतिकार करण्याचा प्रयत्न करुन सरहद्दीचे संरक्षण करताना प्राण गमावला. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस प्रतिवर्षी देशभरात पोलिस स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. दि. १ सप्टेंबर २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत भारतामध्ये एकूण १८८ पोलिस अधिकारी व जवान यांनी कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य पत्करले.वर्षभरात अशाप्रकारे वीरगती प्राप्त झालेल्या देशातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या आत्म्यास शांती लाभो, म्हणून त्यांना भावपूर्ण श्रध्दाजंली अर्पण करतो, असे सामंत यांनी सांगितले. यानंतर पोलिस दलामार्फत हवेत बंदूकीच्या तीन फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून शहिदांना सलामी देण्यात आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिसUday Samantउदय सामंत