शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात कात कारखान्यावर छापा, जीएसटी'ची कारवाई; तपासाबाबत गुप्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 15:16 IST

पथकाच्या हाती काय लागले?

चिपळूण : तालुक्यातील दहीवली खुर्द येथील एका कात उद्योगावर गुरुवारी पहाटे जीएसटी विभागाने छापा टाकल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. सावर्डे परिसरात महिनाभरात ही सलग दुसरी कारवाई आहे. मात्र, याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून, अधिकृतपणे कोणतीच माहिती पुढे आलेली नाही.काही दिवसांपूर्वीच सावर्डे येथील एका कात उद्योजकावर ईडीचा छापा पडला होता. सलग दोन दिवस ईडीचे पथक तिथे ठाण मांडून होते. मात्र, या कारवाईनंतर त्याचे पुढे काय झाले हे अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेले नाही. या कारवाईदरम्यान काही प्रमाणात बेकायदेशीर लाकूडसाठाही आढळला होता. मात्र, त्याबाबतही नेमकी कोणती कारवाई करण्यात आली, हे अद्याप उघड झालेले नाही. या कारवाईनंतरही सावर्डे परिसरातील कात कारखाने तितक्याच जोमाने सुरू आहेत.सावर्डे पंचक्रोशीतील दहीवली खुर्द येथे गेल्या अनेक वर्षांपासून कात कारखाना सुरू आहे. गुरुवारी पहाटे ५:३० वाजता जीएसटी अधिकारी पथकाच्या गाड्यांचा ताफा दहीवली गावात दाखल झाला. पहाटेच्या सुमारास आलेल्या पथकाने कारखान्याचा परिसर पूर्णत: ताब्यात घेत मुख्य प्रवेशद्वारावर सीआयएसएफचे जवान तैनात केले. कारखान्याच्या आत कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही, तसेच बाहेरूनही कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुरूवारी सायंकाळी उशिरापर्यंत अधिकारी कारखान्यात तळ ठोकून होते. मात्र, नेमके काय निष्पन्न झाले हे स्पष्ट झालेले नाही.पथकाच्या हाती काय लागले?जीएसटीचे अधिकाऱ्यांनी पहाटेच छापा टाकला. मात्र, या छाप्यात पथकाने नेमके काय पाहणी केली? पथकाच्या हाती काही लागले आहे? हा छापा नेमका कशासाठी हाेता? याबाबतची सारी माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : GST Raid on Catechu Factory in Chiplun; Investigation Confidential

Web Summary : A GST raid on a catechu factory in Chiplun's Dahivli Khurd caused a stir. Authorities maintained strict confidentiality, mirroring a recent ED raid in Savarde. Details regarding seized illegal wood and investigation outcomes remain undisclosed, even as factory operations continue.