राजापुरात प्रभागनिहाय लसीकरणाला उत्तम प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST2021-07-01T04:22:23+5:302021-07-01T04:22:23+5:30
राजापूर : शहरात पाच जूनपासून राबविण्यात आलेल्या प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेत सुमारे १ हजार ५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आता ...

राजापुरात प्रभागनिहाय लसीकरणाला उत्तम प्रतिसाद
राजापूर : शहरात पाच जूनपासून राबविण्यात आलेल्या प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेत सुमारे १ हजार ५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आता शहरात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांच्या पाठपुराव्याने आणि जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आदेशानुसार राजापूर शहरात ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्यातून ५ जूनपासून प्रभागनिहाय लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ४५ वर्षांच्या पुढील वयोगटातील आणि खासकरून ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरातील आठ प्रभागात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सुमारे १ हजार ५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरातील काही नागरिकांनी यापूर्वी करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत नाव नोंदणी करत लस घेतली आहे. त्यामुळे शहरात आता लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या सुमारे २ हजारपर्यंत पोहोचली आहे.