महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:30 IST2021-04-15T04:30:30+5:302021-04-15T04:30:30+5:30

रत्नागिरी : महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती जिल्ह्यात सर्वत्र शांततेत साजरी करण्यात आली. रत्नागिरी शहरातील ...

The great man Dr. Babasaheb Ambedkar Jayanti in peace | महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत

महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत

रत्नागिरी : महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती जिल्ह्यात सर्वत्र शांततेत साजरी करण्यात आली. रत्नागिरी शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, सोशल डिस्टन्सिंग राखत असंख्य नागरिकांनी त्यांना अभिवादन केले.

कोरोना रुग्णवाढीमुळे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध संस्थांकडून शहरात तसेच ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोनामुळे पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. घरीच राहून भाविकांनी जयंती साजरी करावी, असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे गर्दी न करता शांततेत महामानवाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. काही मंडळांनी सामाजिक बांधीलकी म्हणून सामाजिक अंतर राखत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदान शिबिराला प्राधान्य देण्यात आले.

Web Title: The great man Dr. Babasaheb Ambedkar Jayanti in peace