पदवीधर हर्षालीने राहत्या घरी पिकवली अळंबीची शेती
By Admin | Updated: April 7, 2015 22:36 IST2015-04-07T22:36:14+5:302015-04-07T22:36:14+5:30
विज्ञान युगामध्ये सर्वत्र महिला शक्तीचा प्रत्यंतर पहावयास मिळत आहे. रिक्षा चालकापासून अवकाशयानापर्यंत, कार्यालयातील स्वागतापासून कंपनीच्या एमडीपर्यंत यासारख्या

पदवीधर हर्षालीने राहत्या घरी पिकवली अळंबीची शेती
रत्नागिरी : तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, आज २६ ग्रामपंचायतीतून एकूण ५९३ अर्ज तहसील कार्यालयाकडे दाखल झाले. याआधी २५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे अखेरच्या दिवशी ५० ग्रामपंचायतीतून एकूण ४९३ जागांसाठी एकूण ८४९ अर्ज दाखल झाले आहेत. खरवते ग्रामपंचायतीतून एकही अर्ज न आल्याने आता या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे.
येत्या २२ एप्रिल रोजी तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीतील १७९ प्रभागांमधील एकूण ४९३ जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी ३१ मार्चपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ करण्यात झाला आहे. अर्ज भरण्यास प्रारंभ झाल्यानंतर मध्ये तीन सुट्या आल्याने उमेदवारांनी एकदम सोमवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. काल सोमवारी एकाच दिवशी २३ ग्रामपंचायतींसाठी २३८ अर्ज दाखल झाले. त्याआधी काही ग्रामपंचायतीतून १८ अर्ज आले होते. त्यामुळे सोमवारपर्यंत तालुक्यातून एकूण २५६ अर्ज दाखल झाले आहेत.आज अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने उमेदवारांची झुंबड उडाली होती. आज एकाच दिवशी तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीतून २४० जागांसाठी तब्बल ५९३ अर्ज दाखल झाले. यात काल दाखल केलेल्या काही ग्रामपंचायतींसाठी आज पुन्हा नव्याने अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामुळे एकूण रत्नागिरी तालुक्यातील एकूण ४९३ जागांसाठी आत्तापर्यंत ८४९ अर्ज आले आहेत.रत्नागिरी तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींपैकी खरवते ग्रामपंचायतीसाठी अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी एकही अर्ज न आल्याने आता या ग्रामपंचायतीसाठी पुन्हा नव्याने निवडणूक घ्यावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
मागास प्रवर्गातील उमेदवारांना निवडणुक अर्जासोबत जात पडताळणीसाठी कागदपत्रे दाखल केल्याची पोच जोडावी लागणार असल्याने आज दिवसभर जिल्ह्यातून उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी झाली होती. या आठवड्यात आलेल्या सुटीच्या तीन दिवशीही कागदपत्रे दाखल करून घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होते. त्यामुळे ही कार्यालये सुरूच होती. तेव्हापासून उमेदवारांचा ओघ असला तरी कालपासून मात्र प्रचंड गर्दी झाली होती. आज सायंकाळी उशिरापर्यंत हे काम सुरू होते.
नरत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव, बोंड्ये आणि पूर्णगड या तीन ग्रामपंचायतीत २२ एप्रिल रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. मात्र, आत्तापर्यंत कुवारबाव ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी दोन अर्ज दाखल झाले असून बोंड्ये, पूर्णगड या दोन ग्रामपंचायतींसाठी एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे या दोन ग्रामपंचायतींनाही आता पुढच्या निवडणुकीची वाट पाहवी लागणार आहे.