शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी सहकुटुंब धडकणार रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर

By अरुण आडिवरेकर | Updated: November 6, 2023 16:04 IST

रत्नागिरी : जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटीकरण रद्द करा व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी येत्या ८ नोव्हेंबर २०२३ रोजी ...

रत्नागिरी : जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटीकरण रद्द करा व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी येत्या ८ नोव्हेंबर २०२३ रोजी रत्नागिरीजिल्हाधिकारी कार्यालयावर ‘माझे कुटुंब माझी पेन्शन’ सहकुटुंब महामोर्चा व १४ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या रत्नागिरी शाखेतर्फे या महामाेर्चाची तयारी करण्यात आली आहे.राज्य शासकीय, निम शासकीय, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना रद्द करून निश्चित लाभाची जुनी पेन्शन याेजना लागू करा. कंत्राटीकरणाबाबतचे सर्व शासन निर्णय रद्द करा व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी संपूर्ण राज्यात १४ मार्च ते २० मार्च या कालावधीत बेमुदत संप आणि आक्रोश मोर्चा आंदाेलन पुकारण्यात आले आहे. या आंदाेलनाची तीव्रता लक्षात घेता मुख्यमंत्री यांनी जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच लाभ निश्चित करण्यासाठी निवृत्त सनदी अधिकारी सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली जुनी पेन्शन अभ्यास समिती स्थापन केली.

समितीला शासनाकडून १४ जून २०२३ पर्यंत तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा २ महिने म्हणजेच १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु, या बाबीला आजमितीस ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून जाऊनही या समितीचा अहवाल गुलदस्त्यातच आहे.नियमित आकृतिबंधातील व प्रकल्पातील एकूण १३८ पदे कंत्राटी पद्धतीने कंपन्यांमार्फत आउटसोर्सिंगने भरण्याचा निर्णय ६ सप्टेंबर २०२३ रोजी राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवक/युवती, कंत्राटी कर्मचारी हे सामाजिक व आर्थिक शोषणाचे बळी ठरले आहेत. हा निर्णय रद्द करण्यासाठी आणि अन्य मागण्यांसाठी ‘माझे कुटुंब माझी पेन्शन सहकुटुंब महामोर्चा’ काढण्यात येणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारीagitationआंदोलन