धोकादायक बनल्या ग्रामपंचायती इमारती मोडकळीस

By Admin | Updated: September 22, 2014 00:49 IST2014-09-22T00:48:09+5:302014-09-22T00:49:47+5:30

२५ वर्षे दुर्लक्ष केल्याने कोसळण्याच्या स्थितीत

Gram Panchayat Buildings Beat Dangerous | धोकादायक बनल्या ग्रामपंचायती इमारती मोडकळीस

धोकादायक बनल्या ग्रामपंचायती इमारती मोडकळीस

रहिम दलाल ल्ल रत्नागिरी जिल्ह्यातील २१० ग्रामपंचायतींच्या इमारती फार जुन्या असून, त्या वापरास धोकादायक आहेत़ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील विकासकामांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असतानाच मोडकळीस आलेल्या इमारतींकडे मात्र, शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे़ जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १९ लाख २०६१ असून, त्यापैकी १५ लाख ४,४१ लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागाचा केंद्रबिंदू ८४५ ग्रामपंचायती आहेत़ या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावे, वाड्यांमध्ये विविध योजना राबविण्यात येत आहेत़ त्यामध्ये पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना, ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान, यशवंत ग्रामसमृध्दी योजना, ग्रामसचिवालय योजना व अन्य योजनांचा समावेश आहे़ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांमुळे विविध विकासकामे करीत असताना आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आराखडा ग्रामपंचायतींमध्ये तयार करुन शासनाकडून कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात येत आहेत़ त्यातून स्थानिक मजुरांना रोजगारही उपलब्ध झाला आहे़ ग्रामीण भागात विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्ह्यातील २१० ग्रामपंचायतींच्या इमारती सुमारे २५ वर्षांपूर्वीच्या आहेत़ या इमारती वापरणे धोकादायक असल्याचा निष्कर्ष जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून काढण्यात आला आहे़ धोकादायक असलेल्या या ग्रामपंचायतींच्या इमारतींचे छत मोडकळीस आले असून, काही इमारतींच्या भिंतीना तडे गेले आहेत़ बहुतांश ग्रामपंचायतींच्या छपराची अवस्थाही बिकट आहे. त्यामुळे पावसाळा तर कसाबसा तग धरून काढावा लागतो. ग्रामपंचायतींच्या इमारतींमध्ये कर्मचारी व लोकप्रतिनिधी जीव मुठीत धरुन काम करीत आहेत़ मोडकळीस आलेल्या ग्रामपंचायतींच्या कार्यालयामध्ये पावसाळ्यात कागदपत्र भिजल्याने जुनी आणि महत्त्वाची कागदपत्र खराब होत आहेत़ त्यासाठी नवीन इमारतींची मागणीही ग्रामपंचायतींकडून करण्यात आली आहे़ गावच्या विकासकामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असतानाच नवीन इमारतींच्या बांधकामासाठी शासनाकडे निधी नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ या ग्रामपंचायत इमारतींची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.ाठ ग्रामपंचायती भाड्याच्या जागेत जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायतींची कार्यालये भाड्याच्या इमारतीमध्ये आहेत़ त्यामध्ये खेडमधील ४, चिपळुणातील २ आणि खेड व लांजातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे़ या ग्रामपंचायतीना स्वमालकीच्या वास्तू कधी तयार होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ एकीकडे ग्रामीण भागापर्यंत प्रशासकीय सेवा गतिमान करण्याचा प्रयत्न शासनाकडून होत असताना दुसरीकडे इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याने याबाबत ग्रामीण भागात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तालुका ग्रामपंचायतींच्या इमारती मंडणगड १२ दापोली ५० खेड २४ चिपळूण ३७ गुहागर २० संगमेश्वर १४ रत्नागिरी २६ लांजा १५ राजापूर १२ एकूण २१०

Web Title: Gram Panchayat Buildings Beat Dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.