गोवळ, शिवणे, बारसूतही रिफायनरी समर्थक समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST2021-07-10T04:22:07+5:302021-07-10T04:22:07+5:30
राजापूर : नाणारमध्ये नाही तर रिफायनरी प्रकल्प तालुक्याच्याच बारसू - सोलगाव या भागात व्हावा, यासाठी देवाचेगोठणे, सोलगाव, नाटे दशक्रोशी ...

गोवळ, शिवणे, बारसूतही रिफायनरी समर्थक समिती
राजापूर : नाणारमध्ये नाही तर रिफायनरी प्रकल्प तालुक्याच्याच बारसू - सोलगाव या भागात व्हावा, यासाठी देवाचेगोठणे, सोलगाव, नाटे दशक्रोशी रिफायनरी समितीची स्थानिकांकडून स्थापना करण्यात आलेली आहे. एका पत्रकार परिषदेत राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी ही माहिती दिली.
या समितीच्या सचिवपदी सुरज पेडणेकर यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सोलगाव, बारसू, शिवणे, सोलगाव, देवाचेगोठणे, नाटे आदी भागात रिफायनरी प्रकल्पासाठी जमिनीची शोधाशोध सुरू झाल्याचे वृत्त आल्यानंतर आपण यातील बहुतांशी गावांत जाऊन प्रकल्प समर्थकांची मते आजमावली आहेत. केवळ ही गावेच नव्हे तर लगतचे राजापूर शहर व त्याच्या आसपासचा भाग तसेच तालुक्यात सुबत्ता आणू शकणारा हा प्रकल्प येथे व्हावा, यासाठी ग्रामीण भाग आग्रही असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रकल्पासाठीच्या लढ्यात आपण उतरत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. आपल्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीमध्ये सचिव म्हणून सुरज पेडणेकर (धोपेश्वर) यांची तर उपाध्यक्षपदी दीपक कदम (बारसू), पांडुरंग घाडी, गौरव परांजपे, अविनाश जोशी (गोवळ), पुरूषोत्तम खांबल, रेणुका गुंडये (धोपेश्वर), गणपत पन्हळेकर (पन्हळे) यांची निवड करण्यात आली आहे.
समिती सदस्यपदी अशोक कदम, विनायक नागेश कदम, जयवंत कदम, सचिन धनवी, तेजस धनवी, जान्हवी कदम, राखी राजेंद्र धनवी, भूषण शिर्के, समीर जाधव (पन्हळे), अजय डंबे, मनीष सोगम, संजय गणपत ओगले, सुहास शिंदे, रमेश बाईत, प्रदीप करंबेळकर (धोपेश्वर), दीपक मांडवकर, अक्षय गुरव, प्रवीण कातळकर, मेघराज सावंत, प्रथमेश गोठणकर (गोवळ), एकनाथ खांबल, अमोल सोगम व सिकंदर काझी यांची निवड करण्यात आल्याचे काझी यांनी सांगितले.