शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

घराच्या स्वप्नाला आता सरकारचा हातभार, मुद्रांक शुल्कात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 19:57 IST

home, tax, ratnagiri यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात मार्चपासून कोरोनाचा शिरकाव झाला. देशात २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले आणि पुढचे दोन महिने सर्वच व्यवहार, उद्योगधंदे बंद राहिले. याचा सर्वाधिक फटका महसूल मिळवून देणाऱ्या दस्त नोंदणी कार्यालयाला बसला.

ठळक मुद्देघराच्या स्वप्नाला आता सरकारचा हातभार, मुद्रांक शुल्कात कपातसरकारच्या महसुलात मात्र घट

शोभना कांबळेरत्नागिरी : यावर्षी जिल्ह्यात मार्चपासून कोरोनाचा शिरकाव झाला. देशात २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले आणि पुढचे दोन महिने सर्वच व्यवहार, उद्योगधंदे बंद राहिले. याचा सर्वाधिक फटका महसूल मिळवून देणाऱ्या दस्त नोंदणी कार्यालयाला बसला.

महिनाभर हे कार्यालय बंद राहिले. मे महिन्यात लॉकडाऊन काहीअंशी शिथील झाले. त्यामुळे पुन्हा मालमत्ता खरेदी - विक्रीला सुरुवात झाली. त्यामुळे दस्त नोंदणी सुरू झाली. मात्र, लोकांमध्ये कोरोनाची भीती असल्याने म्हणावे तशी गती मिळाली नाही. मात्र, राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात केलेल्या मुद्रांक शुल्क कपातीमुळे आता दसरा दिवाळीत घरखरेदी उच्चांकी होण्याची चिन्हे आहेत.सरकारने यावर्षी मुद्रांक शुल्कात कपात करताच सप्टेंबर महिन्यात १,७७९ दस्तऐवजाची नोंदणी झाली असून, या महिन्यात ४ कोटी १८ लाख ६९ हजार ४१५ रुपयांचा महसूल मिळाला आहे. गतवर्षी याच महिन्यात १,४०२ दस्त नोंदणी झाली होती. व्यवहार कमी झाले असले तरी मुद्रांक शुल्क सहा टक्के असल्याने त्यातून ४ कोटी ८५ लाख २८ हजार १२ रुपये इतका महसूल मिळाला होता. म्हणजेच ६६ लाख ५८ हजार ५९७ एवढा महसूल अधिक मिळाला होता. मुद्रांक शुल्क कपातीमुळे मध्यमवर्गियांना अधिक दिलासा मिळाला असून, दसरा - दिवाळीत घर खरेदीला अधिक गती येणार आहे.स्टॅम्प ड्युटी कमी केल्याचा परिणामसरकारने स्टँप ड्युटी कमी केल्याने आता मध्यमवर्गियांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे. मात्र, या निर्णयामुळे शासनाचा महसूल तीन टक्क्यांनी कमी होणार आहे. ३ टक्के मुद्रांक शुल्क कपातीचा निर्णय डिसेंबरपर्यत जाहीर करण्यात आला आहे. 

मुद्रांक शुल्क कपातीमुळे शासनाच्या महसुलाला कात्रीमुद्रांक शुल्कात ३ टक्के कपात झाल्याने आता फ्लॅट किंवा घर खरेदीला सप्टेंबर महिन्यात वेग आला आहे. मात्र, अजूनही मुंबई - ठाणे येथून येणाऱ्यांचे प्रमाण यावर्षी कमी आहे. मुद्रांक शुल्क कपातीमुळे शासनाच्या महसुलात निम्म्याने कपात होणार आहे. मात्र, कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने सामान्य माणसांसाठी हा निर्णय घेतला आहे.- वाय. बी. जंगम,सह जिल्हा निबंधक, रत्नागिरी

जीएसटी कमी, व्याज कमीमुद्रांक शुल्क कपातीबरोबरच जीएसटी करही कमी झाला आहे. बँकांनीही कर्जाचे व्याज दर कमी केल्याने दसऱ्याला घर खरेदीला वेग येणार आहे.- नित्यांनद भुते, बांधकाम व्यावसायिक

घर घेणाऱ्यांना दिलासासरकारने मुद्रांक शुल्क तीन टक्के कमी केल्याने घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता लोक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर येऊ लागले आहेत.- प्रवीण लाड, बांधकाम व्यावसायिक

टॅग्स :HomeघरRatnagiriरत्नागिरीTaxकर