शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कर्मचारी कायमचे राहणार दूर, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार शासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 14:39 IST

कंत्राटी पध्दतीने निर्माण केलेली पदे कायमस्वरुपी समजण्यात येऊ नयेत, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने परिपत्रक जाहीर केले आहे़ त्यामुळे गेली अनेक वर्षे कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कायम होण्याच्या आशेवर पाणी फेरले आहे़

ठळक मुद्दे- कंत्राटी पध्दतीने भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना कायम करणार नाही- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शासनाच्या कोट्यवधी रुपयांची होणार बचत.- एनआरएचएम, डाटाएंट्री आॅपरेटर, जलस्वराज्य व अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना फटका.

रहिम दलालरत्नागिरी : कंत्राटी पध्दतीने निर्माण केलेली पदे कायमस्वरुपी समजण्यात येऊ नयेत, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने परिपत्रक जाहीर केले आहे़ त्यामुळे गेली अनेक वर्षे कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कायम होण्याच्या आशेवर पाणी फेरले आहे़गेल्या काही वर्षांपासून शासकीय सेवेत कर्मचाऱ्यांच्या कायमच्या भरतीला कात्री लावण्यात आली आहे़ त्यामुळे शासनाने कायम होणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा कंत्राटी पध्दतीने कर्मचाऱ्यांची भरती करून कोट्यवधी रुपयांची दरवर्षी बचत केली आहे.

आतापर्यंत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, जलस्वराज्य, डाटाएंट्री आॅपरेटर्स तसेच अन्य योजनांसाठी हजारो बेरोजगार युवकांची कंत्राटी कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.एखाद्या कंपनीला कंत्राटी कर्मचारी नियुक्तीचा ठेका देऊन त्यांच्या माध्यमातून शासकीय कामे करुन घेतली जात आहेत़ त्यामुळे डाटाएंट्री आॅपरेटर्सची आजची आर्थिक स्थिती फार बिकट झाली आहे. शासन नियुक्त कंपनीकडून विविध कारणे पुढे करून डाटाएंट्री आॅपरेटर्सना वर्ष-सहा महिन्यांचे मानधनही दिलेले नाही़ अशी स्थानिक सुशिक्षितांची अवस्था आहे.कंत्राटी पध्दतीने नवीन पदांची निर्मिती करताना शासन निर्णयात नवीन अटी व शर्ती तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एखाद्या पदाची नेमणूक करताना ती भरती पूर्णत: कंत्राटी पध्दतीची असल्याची कल्पना देण्यात येते. नियुक्त केलेल्या पदावरील अधिकारी वा कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी म्हणून यापुढे गणले जाणार नाही.

कंत्राटी पध्दतीने करण्यात येणाºया नेमणुका ११ महिन्यांसाठी असतात. आवश्यकता भासल्यास ११ महिन्यानंतर कराराची मुदत वेळोवेळी वाढवण्याची कायद्यात तरतूद आहे. एका कंत्राटी कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त ३ वेळा मुदतवाढ देता येते. त्या पुनश्च नियुक्ती करताना त्याला निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे़अशा प्रकारे कंत्राटी पध्दतीने भरती करताना संबंधित सर्व शासकीय विभागाना शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तींची पालन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत़ सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयानंतर शासनाने काढलेल्या परिपत्रकांमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कायम होण्याच्या आशेवर पाणी फेरले आहे़.

आतापर्यंत सेवेत कायम करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानचे व अन्य कंत्राटी कर्मचारी आंदोलने करीत होते़ परिपत्रकांमुळे कितीही आंदोलने केली तरी काहीही निष्पन्न होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे़निवड मंडळामार्फत नियुक्तीकंत्राटी पध्दतीने भरावयाच्या पदांसाठी शासनाकडून निवड मंडळ गठीत करण्यात येणार आहे़ या निवड मंडळामार्फत शासनाच्या प्रचलित धोरणानुसार त्या त्या पदावरील उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे़ त्यामुळे आता कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्तीही निवड मंडळामार्फतच होणार आहे. यापुढे प्रत्येक जिल्ह्यात निवड मंडळ असेल.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय