शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

कारवाईसाठी सरकारला आजचा ‘अल्टीमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 12:37 AM

शिवाजी गोरे । लोकमत न्यूज नेटवर्क दापोली : पारंपरिक मच्छीमारांचे संघर्षाचे केंद्र असलेल्या हर्णै बंदरातील मच्छीमार एलईडी मासेमारी विरोधात ...

शिवाजी गोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदापोली : पारंपरिक मच्छीमारांचे संघर्षाचे केंद्र असलेल्या हर्णै बंदरातील मच्छीमार एलईडी मासेमारी विरोधात पुन्हा आक्रामक झाले आहेत. दिनांक १ एप्रिलपासून समुद्रात एलईडी लाईटने होणारी मासेमारी बंद झाली नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तिन्ही जिल्ह्यांच्या पारंपरिक मच्छीमार संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सरकारला जाग आली नाही तर लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात मतदान करून पारंपरिक मच्छीमारांची ताकद दाखविण्याची खरी वेळ आली आहे, असा इशारा दापोली - गुहागर - मंडणगड या तालुक्यांच्या संघर्ष समितिने दिला आहे.अनधिकृतपणे पर्ससीन नेट व एलईडीच्या साह्याने होणारी मासेमारी आणि परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सवर १ एप्रिलपर्यंत कारवाई न झाल्यास लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात मतदान करण्याचा एकमुखी ठराव समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. एलईडी लाईट तसेच बंदी कालावधीत मच्छीमारी करणाºया पर्ससीन नौकांवर धडक कार्यवाही करून त्या नौकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करावे व त्या मच्छीमारांवर फौजदारी खटले दाखल करावेत. तसेच संबंधित नौका ज्या मच्छीमारी संस्थेची असेल त्या संस्थेचा डिझेलचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा, तसेच शासनाकडून संबंधित संस्थेला दिला जाणारा डिझेल कोटा कायमस्वरूपी बंद करावा. आतापर्यंत या अनधिकृत मच्छीमार नौका व संबंधित मच्छीमार संस्था यांच्यावर कारवाई न करणारे रत्नागिरी- सिंधुदुर्गचे मत्स्य आयुक्त तसेच संबंधित सर्व परवाना अधिकारी यांना निलंबित करावे, अशा विविध मागण्यांसाठी पारंपरिक मच्छीमार चांगलेच आक्रमक झाले आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गातील मच्छीमार आणि ट्रॉलर व्यावसायिकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मालवण येथे नुकतीच समन्वय समितीची बैठक पार पडली. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग येथील मच्छीमार प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत १ एप्रिल रोजी होणाºया पारंपरिक मच्छीमार महामेळाव्याची रुपरेषा स्पष्ट करण्यात आली. दिनांक १ एप्रिलपर्यंत पर्ससीन व एलईडी मासेमारीवर कारवाई न झाल्यास लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात मतदान करण्याचा एकमुखी ठराव या बैठकीत करण्यात आला. या बैठकीतील ठरावाची माहिती हर्णै बंदरातील मच्छीमारांना देण्यात आली. संघर्ष समिती जो निर्णय घेईल, तो सर्वांना मान्य असेल, अशी भूमिका हर्णैतील मच्छीमार बांधवानी घेतली आहे.सत्ताधारी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर पारंपरिक मच्छीमार नाराज असून, याचा फटका निवडणुकीत बसू नये यासाठी शिवसेना कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.