शासनाने रिक्षा व्यावसायिकांचे कर्ज माफ करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:32 IST2021-04-20T04:32:30+5:302021-04-20T04:32:30+5:30
साखरपा : कोरोनाचा वाढता कहर आणि त्यासाठी कोरोना संसर्गाची वाढती साखळी तोडण्यासाठी संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या ...

शासनाने रिक्षा व्यावसायिकांचे कर्ज माफ करावे
साखरपा : कोरोनाचा वाढता कहर आणि त्यासाठी कोरोना संसर्गाची वाढती साखळी तोडण्यासाठी संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या रिक्षा व्यवसाय बंदच आहे. त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांसाठी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने आता रिक्षा व्यावसायिकांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी रिक्षा व्यावसायिकांनी केली आहे.
संचारबंदीमुळे अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे ९५ टक्के रिक्षा बंद आहेत. रिक्षा व्यवसायावर अवलंबून असलेला व्यावसायिक मेटाकुटीला आला आहे. जनतेची सेवा आणि सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून रिक्षाकडे पाहिले जाते. मात्र, कोरोनाचा काळ आणि बँक कर्जाने घेतलेल्या रिक्षा या कात्रीत रिक्षा व्यावसायिक सापडले आहेत. पुढे बँकेचे हप्ते फेडायचे कसे, अशी समस्या व्यावसायिकांच्या समोर आहे. इतरांप्रमाणे शासनाने थोडी-फार कर्जमाफी देऊन त्यांचे मनोबल उंचवावे. केवळ रिक्षा व्यवसायावरच अवलंबून असलेल्यांना कुटुंब चालवायचे कसे आणि बँकांचा हप्ता भरायचा कसा, असा प्रश्न पडला आहे. सध्या रिक्षा व्यावसायिक लॉकडाऊन काळात बेजार झाला आहे. त्यांना शासनाने आधार देण्याची मागणी करण्यात येत आहे.