शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

बारसूत जमीन घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी होणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

By मनोज मुळ्ये | Updated: April 29, 2023 17:41 IST

खासदार विनायक राऊत यांनी केला होता गौप्यस्फोट

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प क्षेत्रात सरकारी अधिकाऱ्यांनी जागा घेतल्या आहेत का, त्या कशा घेतल्या आहेत, याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली असून, दोन दिवसात ही चौकशी केली जाईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. ज्यांनी १३७ गुंठे जमीन घेतल्याचा आक्षेप घेतला जात आहे, त्या महावितरणच्या अभियंत्याची बदली आपण मुंबईला मुख्यालयात केल्याचेही त्यांनी सांगितले.शनिवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्तावित रिफायनरीबाबत आढावा बैठक झाली. आंदोलक ग्रामस्थांनी केलेल्या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत आपण तातडीने मुंबईहून रत्नागिरीत आल्याचे आणि ही बैठक बोलावल्याचे मंत्री सामंत यांनी संगितले. या बैठकीला खासदार विनायक राऊत, पोलिस महासंचालक प्रमोद पवार, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अजित यशवंतराव यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.रिफायनरी प्रकल्पविरोधी संघटनांना चर्चा करावयाची असल्याने ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र काहींना कमी कालावधीमुळे बैठकीला येणे शक्य नव्हते. काहींना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पविरोधी संघटनांचे नेते येथे उपस्थित नव्हते. त्यांच्याशी आपण दूरध्वनीवरुन चर्चा केली. ही बैठक जिल्ह्याच्या बाहेर घेण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता ही बैठक २ किंवा ३ मे रोजी मुंबईत होणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.चर्चेसाठी शासनाने एक पाऊल पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र आता शासनाने चार पावले पुढे टाकली आहेत. आंदोलकांवर ३५३ कलम (जबरी मारहाण) लावण्यात येणार असल्याची शंका खासदार विनायक राऊत यांनी मांडली आणि ते मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. मात्र हे कलम लावण्यात येणार नसल्याचे सामंत यांनी सांगितले.बारसू भागामध्ये प्रकल्प येणार म्हणून काही जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार झाले आहेत. त्यात शासकीय अधिकारी पुढे आहेत, असे खासदार राऊत यांनी बैठकीत सांगितले. त्याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेण्यात आली आहे. कोणीकोणी प्रमाणाबाहेर जागा घेतल्या आहेत, त्या कशा घेतल्या आहेत, याची चौकशी ही समिती दाेन दिवसात करेल. अवैध पद्धतीने ही जागा घेण्यात आली असेल तर अशा अधिकाऱ्याला निलंबितची कारवाई सरकारकडून केली जाईल, असेही सामंत म्हणाले.

महावितरणमधील अभियंत्याची तडकाफडकी बदलीमहावितरणच्या राजापूर येथील अभियंता डोंगरे याच्या नावावरच १३७ गुंठे जागा बारसू परिसरात आहे. त्याची तातडीने मुंबई मुख्यालयात बदली करण्यात आली आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादरीकरणआवश्यकता असेल तर या प्रकल्पाबाबतची सद्यस्थिती, आतापर्यंत झालेली कार्यवाही याबाबतचे सादरीकरण जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना करतील. त्यासाठी ते किंवा कोकण आयुक्त ठाकरे यांच्याशी बोलतील आणि त्यांच्यासमोर याचे सादरीकरण केले जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन आपण हा निर्णय घेतला असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.शरद पवार यांना दिली माहितीराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांना एकूणच घडामोडींबाबत जिल्हाधिकरी यांनी माहिती दिली आहे. इतर कोणत्याही पक्षांना याबाबतची माहिती हवी असेल तर त्यांनाही ती दिली जाईल. त्यांच्या मनातील गैरसमज दूर केले जातील, असे मंत्री सामंत म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBarsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्पUday Samantउदय सामंतVinayak Rautविनायक राऊत